IND vs WI: बॉल XXXX वर जाऊन लागला, मैदानावर विराट कोहलीच्या तोंडून निघाले नको ते शब्द

विराट कोहली (Virat kohli) आता भले भारतीय संघाचा कर्णधार नाहीय. पण मैदानावरील निर्णय प्रक्रियेत अजूनही तो महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. एकदिवसीय मालिका असो किंवा टी 20 क्रिकेट रोहितने (Rohit sharma) विराटच ऐकून लगेच DRS चे निर्णय घेतल्याचं पहायला मिळालं.

IND vs WI: बॉल XXXX वर जाऊन लागला, मैदानावर विराट कोहलीच्या तोंडून निघाले नको ते शब्द
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 2:33 PM

कोलकाता: विराट कोहली (Virat kohli) आता भले भारतीय संघाचा कर्णधार नाहीय. पण मैदानावरील निर्णय प्रक्रियेत अजूनही तो महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. एकदिवसीय मालिका असो किंवा टी 20 क्रिकेट रोहितने (Rohit sharma) विराटच ऐकून लगेच DRS चे निर्णय घेतल्याचं पहायला मिळालं. रोहितने विराटवर दाखवलेला विश्वासही योग्य ठरल्याचं काही निर्णयातून दिसलं. कालच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहलीच्या तोंडून अपशब्द निघाले. DRS घ्यायचा की, नाही त्यावर चर्चा सुरु असताना विराट कोहलीन मैदानात नको ते बोलून गेला. स्टंम्पसवरच्या मायक्रोफोनने लगेच ते शब्द पकडले. सध्या कोरोनामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाहीय. प्रेक्षकांचा गोंगाट नसल्यामुळे मैदानावर खेळाडूंमध्ये घडणारा संवाद घरबसल्या प्रेक्षकांनाही समजतो. त्यामुळे विराट कोहलीच्या तोंडून निघालेले हे शब्द सर्वांनाच समजले. नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. समोर रॉस्टन चेस होता.

चहलला हवा होता DRS चहलने फ्लाइटेड चेंडू टाकला. चेसने पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉल पॅडला लागला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी पायचीतच मोठ अपील केलं. पंचांना ते अपील पटलं नाही. त्यामुळे त्यांनी अपील फेटाळून लावलं. रोहितने DRS घ्यावा, अशी चहलची इच्छा होती.

चेंडू कुठे लागला? DRS घ्यायचा की नाही यावरुन चर्चा सुरु असताना कोहलीने त्याचं मत सांगितलं. चेंडू रॉस्टन चेसच्या पार्श्वभागावर लागल्याचं त्याने सांगितलं. कोहलीने हे सांगताना वापरलेले शब्द खूप अयोग्य होते. XXXX वर बॉल लागल्याचं कोहली म्हणाला. स्टंम्पसवरच्या मायक्रोफोनने लगेच ते शब्द पकडले. कोहली हे शब्द वापरत असल्याचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. रोहितने तरीही DRS घेतला. पण तो वाया गेला.

India vs west indies virat kohli use wrong words while discussion about drs decision

Non Stop LIVE Update
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.