IND VS WI: रोहितने घेतली इशान किशनची शाळा, हात बांधून 15.25 कोटी घेणाऱ्या खेळाडूने गुपचूप सर्व घेतलं ऐकून

भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टी 20 सामन्यात (India vs West Indies, 1st T20I) टीम इंडियाने बुधवारी शानदार विजय मिळवला.

IND VS WI: रोहितने घेतली इशान किशनची शाळा, हात बांधून 15.25 कोटी घेणाऱ्या खेळाडूने गुपचूप सर्व घेतलं ऐकून
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 1:56 PM

कोलकाता: भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टी 20 सामन्यात (India vs West Indies, 1st T20I) टीम इंडियाने बुधवारी शानदार विजय मिळवला. वेस्ट इंडिजला सहा विकेटने पराभूत करुन मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सलामीवीर इशान किशनची (Ishan Kishan) शाळा घेतली. सामन्यानंतर रोहित इशान किशनसोबत चर्चा करताना दिसला. रोहित बोलत होता, त्यावेळी इशान किशन हात बांधून मान खाली करुन सर्व काही गपचूप ऐकत होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात हा डावखुरा स्फोटक फलंदाज थोडा गोंधळलेला दिसला. त्यामुळे रोहित शर्माने त्याचा क्लास घेतला. इशान किशनने 35 धावा करण्यासाठी 42 चेंडू घेतले. अशी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित नाहीय. 83.33 इशान किशनचा स्ट्राइक रेट होता. त्याने चार चौकार लगावले.

काय सांगितलं रोहितने ?

इशान किशन या सामन्यात सहजतेने फलंदाजी करताना दिसला नाही. स्ट्राइक रोटेट करतानाही त्याला अडचण येत होती. अपेक्षित फलंदाजी होत नसल्याने अखेर फॅबियन एलेनच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून किशन बाद झाला. रोहित शर्माने इशान किशनला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्याशिवाय त्याने स्ट्राइक रोटेट करण्याचाही सल्ला दिला. जेणेकरुन त्याच्यावर दबाव येणार नाही. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

स्ट्राइक रोटेटकडे लक्ष दे

“खेळपट्टीवर जाऊन स्ट्राइक रोटेट करण्यावर लक्ष दे. इशानला फक्त थोड्या सामन्यांची आवश्यकता आहे. त्याच्यावर भरपूर दबाव आहे. इशान किशनला कुठलाही दबाव जाणवणार नाही, याची काळजी घेणं, आमचं काम आहे” असं रोहित शर्माने सांगितलं. कालच्या सामन्यात रोहितने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 19 चेंडूत 40 धावा फटकावल्या. या उलट इशान किशनने खूप संथ फलंदाजी केली. तो 12 षटकांपर्यंत क्रीझवर होता. पण त्याने फक्त 35 धावा केल्या.

सूर्यकुमार-वेंकटेश अय्यरची चांगली फलंदाजी

इशान किशन अडखळला पण सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी केली. सूर्यकुमारने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. अय्यरने सुद्धा दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 24 धावा केल्या. भारताने हा सामना सात चेंडू आणि सहा विकेट राखून जिंकला.

rohit sharma talk with ishan kishan after his slow batting india vs west indies 1st t20

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.