Indis vs England: इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटीसाठी टीमची घोषणा, 700 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या दिग्गजाचं पुनरागमन

| Updated on: May 22, 2022 | 7:12 PM

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यासाठी पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंडला रवाना होईल. त्या कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

Indis vs England: इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटीसाठी टीमची घोषणा, 700 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या दिग्गजाचं पुनरागमन
India Test Squad
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका (England Test Series) जिंकण्यासाठी पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंडला रवाना होईल. त्या कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची (Team india test squad) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा परदेशात कसोटी सामना खेळण्यासाठी जाईल. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला फक्त एक कसोटी सामना खेळायचा आहे. कोरोना संक्रमणामुळे मागच्यावर्षी एक कसोटी सामना बाकी राहिला होता. BCCI च्या निवड समितीने 17 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. चेतेश्वर पुजाराने टीममध्ये कमबॅक केलं आहे. निवड समितीने आज इंग्लंडमधला एकमेव कसोटी सामना आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांसाठी आज टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी संघात कुठलाही मोठा बदल करण्यात आलेला नाही. मयंक अग्रवालला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

शुभमन गिलचीही निवड

सलामीची जबाबदारी कॅप्टन रोहित शर्मासोबत केएल राहुल संभाळणार आहे. बॅकअप ओपनर म्हणून शुभमन गिलचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

चेतेश्वर पुजाराचं कमबॅक

चेतेश्वर पुजाराने संघात कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्याआधीच्या खराब कामगिरीमुळे चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आलं होतं. श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. पण आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी त्याची निवड झालीय. चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो तिथे काऊंटी खेळतोय. काऊंटीमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं आहे. तिथे त्याने शतकं, द्विशतक झळकावली आहेत. त्याची टीम इंडियात निवड होईल, अशी अपेक्षा होती. निवड समितीच्या सदस्याने तसे संकेतही दिले होते. अखेर त्याची टीम इंडियाच्या कसोटी संघात निवड झाली आहे. काऊंटीमध्ये पुजाराने 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची संघात निवड झाली आहे.

कसोटी मालिका जिंकण्याची संधी

मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु झाली होती. भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार होता. पण भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाची लागण झाल्याने ही कसोटी स्थगित करण्यात आली. आता 1 जुलैला हा कसोटी सामना होईल. भारताने हा कसोटी सामना जिंकला किंवा ड्रॉ केला, तर 15 वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळेल.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जाडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा,