IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत पुनरागमनासाठी ‘हे’ करावं लागेल, दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीय संघाला सल्ला

| Updated on: Aug 26, 2021 | 11:57 AM

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचे फलंदाज अतिशय खराब प्रदर्शन करत अवघ्या 78 धावांवर सर्वबाद झाले आहेत. ज्यानंतर गोलंदाजही खास कामगिरी करत नसून इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागिदारी केल्यानंतरही भारतीयांना एकही विकेट घेता आलेला नाही.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत पुनरागमनासाठी हे करावं लागेल, दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीय संघाला सल्ला
भारतीय क्रिकेट संघ
Follow us on

लंडन : लॉर्ड्स मैदानातील अप्रतिम विजयानंतर तिसऱ्या कसोटीतही भारत इंग्लंड संघावर वर्चस्व मिळवेल असे सर्वांना वाटत होते. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच उद्दशाने बुधवारी हेडिंग्ले कसोटीची सुरुवात देखील केली. नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. पण पाहता पाहता भारतीय फलंदाज तंबूत परतू लागले आणि अवघ्या 78 धावांत सर्व संघ बाद झाला. ज्यानंतर गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतरही दिवसाखेर इंग्लंड संघाने 120 धावा केल्या असताना भारताला एकही विकेट मिळवता आलेला नाही. दरम्यान अशा परिस्थितीत भारताचा माजी गोलंदाज आणि दिग्गज क्रिकेटपटू जहीर खानने (Zaheer Khan) भारतीय संघाला सामन्यात पुनरागमनासाठी एक कानमंत्र दिला आहे.

जहीरने भारताला सामन्यात पुन्हा येऊ चांगलं प्रदर्शन करण्यासाठी पहिल्या डावाता संपूर्णपणे विसरुन खेळण्याचा सल्ला दिला आहे. क्रिडा वेबसाइट क्रिकबजशी बोलताना जहीर खान म्हणाला, ‘इंग्लंड संघाने भारतीय संघाला सामन्यात फार मागे ढकलले आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर या सामन्यात जिंकण हे एक मोठे आव्हान आहे.

‘मानसिकता बदलून खेळणं गरजेचं’

जहीरने क्रिकबजशी बोलताना म्हणाला,“सध्या सामन्यात इंग्लंडच्या सलामी जोडीने उत्कृष्ट भागिदारी करत भारतीय संघाला सामन्यात फार मागे टाकले आहे. इंग्लंडकडे सध्या 42 धावांची आघाडी आहे. तर दुसरीकडे भारत एकही विकेट घेण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडला सर्वबाद करण्यासाठी नव्या जोमात खेळावं लागेल ज्यासाठी पहिल्या दिवशीचा खेळ विसरणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु करताना मानसिकता बदलून खेळावं लागेल. दरम्यान हा पाच दिवसांचा सामना असल्यामुळे असा एका दिवशीचा खेळ विसरुन खेळणं अवघड असलं तरी भारताला सामन्यात पुनरागमनासाठी हे करावचं लागेल.”

हे ही वाचा

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

(Indian Cricketer zaheer khan says indian team need to forget the first inning of the third test)