भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

सोशल मीडिया म्हटलं की त्यावर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. त्यात हिरो-हिरोईन्ससह क्रिकेटर्सच्या तर प्रत्येक गोष्टी व्हायरल होतात. आताही असेच क्रिकेटपटूंचे एडिटेड फोटो व्हायर होत आहेत.

भारतीय खेळाडूंचे हे 'एडिटेड' फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच
जसप्रीत आणि रोहितचा एडिटेड फोटो

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असून भारताने 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्ही सामन्यात उत्तम खेळ दाखवला. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना अनिर्णीत राहिला. मात्र दुसऱ्या सामन्यात अप्रतिम विजय मिळवल्यामुळे सर्व खेळाडूंचे कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी तर भारतीय संघावर फार प्रेम करतात. सोशल मीडियावर सामन्यांच्या दिवशीच नाही इतर वेळीदेखील क्रिकेटपटंचेच फोटो आणि व्हिडीओ अधिक असतात. अशा या क्रिकेटवेड्या देशात खेळाडूंना प्रेमासह अनेकदा ट्रोलही केलं जात. तर कधी त्यांचे मजेशीर फोटो तयार करुन त्यांची मजा घेतली जाते. अनेकदा खेळाडू देखील हे सर्व खेळकर वृत्तीने घेतात. सध्या देखील असेच काही भारतीय क्रिकेटपटूंचे मजेशीर फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये खेळाडूंना एडिटिंगच्या मदतीने जाडजूड दाखवण्यात आलं आहे.

या सर्व फोटोंना पाहून इंटरनेटवर एकस हाश्या पिकला आहे. अनेकजण हे फोटो शेअर करत आहेत. काहीजण खेळाडूंना फिच राहा नाहीतर अशीच परिस्थिती येईल असं म्हणून त्यांची मजा घेत आहेत. अनेकजण हे फोटो व्हायरल करत असून इन्स्टाग्रामवर क्रिकेट मीम्स  (cricket_._memes) या पेजने अनेक क्रिकेटपटूंचे असे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रवींद्र जाडेजा असे सारेच खेळाडू आहेत. चलातर पाहूया कसे दिसतील आपले आवडते क्रिकेटपटू जाडजुड झाल्यानंतर….

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricket Memes (@cricket_._memes)

महिला क्रिकेटपटूंचे फोटोही पाहा

संबधित पेजवरच महिला क्रिकेटपटूंचेही एडिटेड फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये कर्णधार मिथाली राज, स्मृती मंधाना, तानिया भाटिया, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि झूलन गोस्वामी या सर्व भारतीय महिला क्रिकेटपटूंचे एडिट केलेले फोटोज दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricket Memes (@cricket_._memes)

इतर बातम्या

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Indian Cricketers Chubby photos edited by fans went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI