AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत अँडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला होता? ज्यानंतर बुमराह चवताळला, आश्विनने केला खुलासा

इंग्लंडविरुद्धचा लॉर्ड्स मैदानातील भारताचा दुसरा कसोटी सामना अत्यंत चुरशीचा आणि उत्कटांवर्धक झाला. आक्रमक क्रिकेटसोबत दोन्ही संघाचे खेळाडू आक्रमक अंदाजात दिसून आले. यावेळी बुमराह आणि अँडरसन यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता.

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत अँडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला होता? ज्यानंतर बुमराह चवताळला, आश्विनने केला खुलासा
जसप्रीत बुमराह
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 2:10 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lord’s) मैदानात भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. सामन्यात सुरुवातीला फलंदाजाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सामना अनिर्णीत करण्यासाठीच भारत खेळत आहे, असे वाटत होते. पण सामन्याच्या अखेरच्या डावात भारतीय संघाने पुन्हा गरुडभरारी घेत सामन्यात दमदार विजय मिळवला. अशा या रंगतदार सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू चांगलेच जोशात आल्याने मैदानावर गरमा-गरमीचे वातावरण पाहायला मिळत होते. यामध्ये भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) तर इंग्लंडच्या खेळाडूंना ठसण देत अप्रतिम खेळही दाखवला. तब्बल 8 विकेट्स घेत सिराजने विजयात मोठा हातभार लावला. पण या सर्व वादांमध्ये गाजला तो जसप्रीत बुमराह विरुद्ध जेम्स अँडरसन (Jasprit bumrah and James Anderson) यांच्यातील वाद.

सुरुवातीला इंग्लंडच्या फलंदाजी वेळी बुमराहने अँडरसनला काही बाऊन्सर्स टाकले, ज्यानंतर अँडरसनने बुमराहला शाब्दीक टीका केली. ज्याचा पुरेपुर बदला बुमराहने फलंदाजी करताना घेत अँडरसनसह सर्व इंग्लंडच्या गोलंदाजांना उत्तम धावा ठोकल्या. शमीसह बुमराहने केलेली नाबाद 89 धावांची भागिदारीच सामन्यात टर्निंग पॉईंट ठरली. तर या सर्वासाठी जबाबदार असणारी अँडरसनची नेमकी टीका काय होती? तो काय म्हणाला होता? याचा खुलासा दिग्गज फिरकीपटू आर. आश्विनने केला आहे. आश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताचे फील्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासह बातचीत करताना दुसऱ्या कसोटीतील बुमराह आणि अँडरसन वादावर प्रकाश टाकला.

काय म्हणाला होता अँडरसन?

बुमराहच्या काही बाऊन्सर्सनंतर अँडरसन त्याला म्हणाला, ”मित्रा तू इतके फास्ट बोल का टाकत आहेस? मी तुला इतकी फास्ट बोलिंग करत होतोका? इतरांना 80m/h च्या स्पीडने टाकणारा तू मला पाहून 90m/h च्या स्पीडने बोल टाकत आहेस.” अँडरसनच्या या वक्तव्यावर आश्विन पुढे बोलताना म्हणाला, अँडरसनला हॅल्मेटवर बोल लागला यासाठी मला वाईट वाटतं, पण त्याच्याकडून अशाप्रकारचं वक्तव्य येणं चूकीचं होतं” विशेष म्हणजे या सर्वाबाबत बुमराह त्यावेळी इतका खंबीर झाला नाही. पण ड्रेसिंग रुममध्ये आश्विनने बुमराहला नेमकं अँडरसनचं बोलणं समजावलं असता. बुमराह फलंदाजीवेळी वेगळ्याच जोशात दिसला. महत्त्वाचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर बुमराग आणि शमीवर सर्व जबाबदारी पडली. त्याचवेळी दोघांनी मिळून नाबाद 89 धावांची भागिदारी रचली ज्यात शमीने 56 आणि बुमराहने 34 धावा केल्या. याच भागिदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडला एक उत्तम असे 272 धावांचे आव्हान दिले. ज्याचा पाठलाग इंग्लंडचा संघ करु शकला नाही आणइ भारत 151 धावांनी विजयी झाला.

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(R Ashwin revealed what james anderson said to jasprit bumrah in second test at lords)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.