IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 16, 2021 | 11:38 PM

इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. दरम्यान, पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (IND vs ENG : India Defeated England in Lords Test by 151 runs, KL Rahul player of the match)

या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने त्याचं योगदान दिलं आहे. पहिल्या डावात लोकेश राहुलने शतक ठोकलं. तर रोहित शर्माने 83 धावांची जबरदस्त खेळी केली. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने चिवट फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक ठोकलं. तसेच अखेरच्या सत्रात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरहाने मोठी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. तसेच गोलंदाजांनीदेखील दोन्ही डावात निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 4, इशांत शर्माने 3, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले. तर दुसऱ्या डावात सिराजने पुन्हा एकदा 4 विकेट घेतल्या. बुमराहने 3, इशांतने 2 आणि शमीने 1 विकेट घेतली.

शमी-बुमराहची रेकॉर्डब्रेक भागीदारी

लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ज्यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा आहे, त्यांनी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohhmeed Shami) या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड मोडीत काढला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 91 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल (Madan Lal) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती.

रहाणे-पुजाराची चिवट खेळी

दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली होती. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात 5 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ 21 धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 20 धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल 297 चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने 146 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तर पुजाराने 45 धावांची खेळी केली.

शमीचं इंग्लंड विरुद्ध दुसरं अर्धशतक

मोहम्मद शमीमे लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर षटकार ठोकत अर्धशतक साजरं केलं. शमीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरं अर्धशतक ठरलं आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही अर्धशतकं शमीने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्याच मैदानात फटकावली आहेत. याआधी शमीने 2014 मध्ये नॉटिंगघममध्ये अर्धशतक लगावलं होतं.

लॉर्ड्सवर तिसरा विजय

भारताचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरील हा तिसरा कसोटी विजय ठरला आहे. याआधी भारताने 2014 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला होता. तर या क्रिकेटच्या पंढरीतला पहिला वहिला ऐतिहासिक विजय हा कपिल देव यांनी आपल्या कॅपटन्सीत मिळवून दिला होता. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला होता.

इतर बातम्या

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

(IND vs ENG : India Defeated England in Lords Test by 151 runs, KL Rahul player of the match)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI