टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सात पदकांवर नाव कोरलं. तर काही खेळाडूंचं पदक मात्र थोडक्यात हुकलं. पण टाटा मोटर्सने या खेळाडूंचाही सन्मान करत त्यांना भेट म्हणून एक धांसू कार दिली आहे.

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार
भारतीय महिला हॉकी संघासह पैलवान दीपक पुनिया आणि गोल्फर आदिती अशोक
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 3:08 PM

मुंबई : भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरली. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympic 2020) भारताने 12 वर्षानंतर सुवर्णपदक मिळवत एकूण सात पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये 6 पदक जिंकण्याचा स्वत:चा रेकॉर्ड तोडत यंदा 7 ऑलिम्पिक पदकं पटकावली. पण या पदकांची संख्या आणखी वाढली असती जर काही भारतीय खेळाडू थोडक्यात पदक जिंकण्यापासून हुकले नसते. भारतीय महिला हॉकी संघ, गॉल्फर आदिती अशोक आणि पैलवान दीपक पुनिया यांचे कांस्य पदक (Bronze medal) थोडक्यात हुकले. पण यानंतरही भारतातील आघाडीची मोटर कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांचा सन्मान करत त्यांना टाटाची अल्ट्रोज (Tata Altroz) ही आलिशान गाडी गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे.

टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, ”ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडूंनी चौथे स्थान पटकावले, ज्यामुळे त्यांचे पदक हुकले. मात्र त्यांनी मनं नक्कीच जिंकली. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन त्यांनी इतक्या तणावाखाली देखील अप्रतिम कामगिरी केली. पदकापासून थोडक्यात हुकले असले तरी त्यांची मेहनत आणि खेळ सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.” खेळाडूंच्या या अप्रतिम कामगिरीमुळे टाटा मोटर्सकडून त्यांना टाटा अल्ट्रोज ही कार गिफ्ट देण्याची घोषणा चंद्रा यांनी केली. त्याबद्दल चंद्रा म्हणाले, “टाटा अल्ट्रोज या गाडीने मार्केटमध्ये चांगले स्थान मिळवले आहे. त्यामुळे कांस्य पदकापासून थोडक्यात हुकलेल्या खेळाडूंचा सन्मान म्हणून ही गाडी त्यांना गिफ्ट देण्यात येत आहे. यामध्ये गॉल्फर आदिती अशोक (Golfer Aditi Ashok) जी अगदी काही गुणांनी तिसऱ्या स्थानापासून दूर राहीली तिच्यासह  ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या महिला हॉकी संघाचाही समावेश आहे. तसेच पैलवान दीपक पुनिया (Deepak Punia) याच्या कामगिरीचा सन्मानही आम्ही ही भेट देऊन करु इच्छितो.”

भारताला एकूण सात पदकं

टोक्योमध्ये भारताला एकूण सात पदकं मिळवण्यात यश आलं. या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

इतर बातम्या

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

(Tata Motors Gifted tata altroz car to indian athletes who nearly missed there bronze At Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल.
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही...
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही....
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर.
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?.
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.