तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 7:40 PM

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून मालिकेच्या सुरुवातीला काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे श्रीलंका दौऱ्यातील सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना लंडनला बोलावून घेण्यात आले आहे.

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
सूर्यकुमार यादव पत्नीसोबत

Follow us on

लंडन : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच संघातील शुभमन गिलसह काही खेळाडू दुखपाग्रस्त झाल्याने संघात आणखी खेळाडूंची गरज भासली. अशावेळी युवा संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या सूर्यकुमारसह पृथ्वी शॉ यांना बोलावून घेण्यात आले. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावरुन परस्पर सूर्या इंग्लंडला पोहोचला. त्यामुळे बराच काळ कुटुंबापासून दूर असणाऱ्या सूर्याला अखेर पत्नीला भेटण्याचा योग इंग्लंडमधील विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आला.

तब्बल 65 दिवसानंतर पत्नीला भेटलेला सूर्यकुमारला अत्यंत आनंद झाला असून त्यामुळे तो थेट लंडनच्या रस्त्यांवर डान्स करत आनंद व्यक्त करत आहे. तो पत्नी देविशा शेट्टीसोबत डान्स करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम रिल तयार करुन त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट देखील केले आहे. या व्हिडीओमध्ये सूर्याने लिहिले आहेकी, ‘जेव्हा तुम्ही तिला (पत्नीला) 65 दिवसांनंतर भेटता, तेव्हा प्रत्येक दिवस हा पार्टी सारखा वाटतो.’

View this post on Instagram

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

सूर्याकुमारचं कसोटी पदार्पण लांबणीवर?

शुभमन गिल, मयांक अगरवाल यांच्यासारखे फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे सूर्याकुमार आणि पृथ्वी यांना इंग्लंड दौऱ्यावर बोलवण्यात आले आहे. मात्र अंतिम 11 मध्ये सूर्याची इतक्यात निवड अवघड दिसत आहे. सध्या सलामीवीर केएल राहुल आणि रोहिथ शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने या दौऱ्याततरी नवख्या सूर्यकुमारला संधी मिळण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.

इतर बातम्या

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या आवडी-निवडी, आवडता डायलॉग आणि अभिनेत्याबद्दल बोलताना म्हणाला..

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI