IPL : स्पॉट फिक्सिंग करणाऱ्या या खेळाडूच्या कानाखाली भज्जीने काढलेला जाळ, IPL मधील सर्वात मोठे वाद

| Updated on: Mar 15, 2023 | 6:01 PM

आयपीएल लीग ही जगभर प्रसिद्ध आहे मात्र तुम्हाला माहित आहे का आयपीएलमध्ये असे काही वाद आहेत जे आजही प्रत्येकाच्या लक्षात असतील. कोणते वाद आहेत ते आपण पाहणार आहोत.

IPL : स्पॉट फिक्सिंग करणाऱ्या या खेळाडूच्या कानाखाली भज्जीने काढलेला जाळ, IPL मधील सर्वात मोठे वाद
Follow us on

मुंबई : सध्या वूमन्स आयपीएल चालू असून काहीच दिवसांवर पुरूष आयपीएल आली आहे. 31 मार्चला पहिला सामना होणार असून क्रीडा चाहतेही उत्सकु आहेत. आयपीएल लीग ही जगभर प्रसिद्ध आहे मात्र तुम्हाला माहित आहे का आयपीएलमध्ये असे काही वाद आहेत जे आजही प्रत्येकाच्या लक्षात असतील. कोणते वाद आहेत ते आपण पाहणार आहोत.

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याने भर मैदानामध्ये विरोधी संघातील खेळाडूच्या कानशिलात लगावली होती. ज्याच्या कानाखाली मारली होती तो खेळाडू आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडला होता. आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये मुंबई इंडिअन्स संघाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या हरभजन सिंहने किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. सामना झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा प्रकार घडला होता. हरभजन सिंग दोषी आढळल्यानंतर उर्वरित स्पर्धेपासून बंदी घालण्यात आली होती.

कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक असलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएल सामन्यानंतर अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती. शाहरुखचा एका गार्डसोबत वाद झाला होता आणि त्याने त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

सर्व जगभर प्रसिद्ध असलेल्या आयपीएलची सुरूवात करणारे ललित मोदी यांना या लीगच्या मागचं मास्टर माईंड बोललं जातं. मात्र कथित गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. बीसीसीआयने चौकशी सुरू केली आणि त्यांना दोषी ठरवण्यात आलं. मात्र ललित मोदींनी हे आरोप फेटाळून लावत ईडीचा तपास सुरू होण्याआधीच ते देश सोडून पळून गेले.

आयपीएल स्पर्धा 2008 साली सुरू झाली होती मात्र 2013 ला या स्पर्धेला डाग लागला. दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू एस श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. तिन्ही खेळाडूंनान निलंबित करण्यात आलं होतं.