
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवानंतर भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान दुसरीकडे भारताचे तरुण क्रिकेटपटू श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाले असून बीसीसीआयने त्यांचे जीममधील फोटो पोस्ट केले आहेत. वरील फोटोमध्ये आयपीएलमध्ये तुफान कामगिरी करणारा आरसीबीचा देवदत्त पड्डीकल (Devdatta paddikal) आणि चेन्नईचा कृष्णाप्पा गौथम (krishnappa gowtham) हे दोघे आहेत.

मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने मागील सीझनमध्ये खास कामगिरी न केल्याने त्याच्यावर टीका होत होत्या. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये गायकवाडने धमाकेदार सलामीलवीराची भूमिका निभावत श्रीलंका दौऱ्यात आपली जागा निश्चित केली आहे.

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या चेतन सकारियाने (chetan sakariya) देखील निवडकर्त्यांची मनं जिंकल्याने त्यालाही एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून श्रीलंका दौऱ्यात घेण्यात आले आहे.

कोलकाता नाईट रायजर्स संघाचा महत्त्वाचा फलंदाज नितीश राणा (Nitish rana) हा देखील श्रीलंका दौऱ्यातील संघात आहे. राणाची देखील ही पहिलीच परदेश वारी असल्याने त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा बीसीसीआयसह सर्व क्रिकेटरसिक व्यक्त करत आहेत.