Pakistan Cricket | पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पडली फूट, न्यूझीलंडमध्ये कशावरुन झाला इतका वाद?

Pakistan Cricekt Team | पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याची बातमी आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी टीममध्ये वाद सुरु आहेत. पाकिस्तानी टीममध्ये गटबाजी झाली आहे. सीनियर खेळाडू नाराज आहेत. आधीच पाकिस्तानी टीम सीरीजमध्ये पिछाडीवर पडली आहे.

Pakistan Cricket | पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पडली फूट, न्यूझीलंडमध्ये कशावरुन झाला इतका वाद?
Pakistan Cricekt Team
Image Credit source: pcb
| Updated on: Jan 16, 2024 | 8:31 AM

Pakistan Cricket Team | पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये फूट पडल्याची बातमी आहे. पाकिस्तान टीम न्यूझीलंडमध्ये 5 T20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. आधीच दोन सामने गमावून पाकिस्तान टीम 0-2 ने पिछाडीवर आहे. सीरीजमध्ये मागे पडलेल्या पाकिस्तान टीमची स्थिती चांगली नाहीय. त्यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. कोच आणि खेळाडूंमध्ये वाद सुरु आहे. मॅनेजमेंट बरोबर जमत नसल्याची माहिती आहे. न्यूझीलंड विरुद्ध तिसरा T20 सामना खेळण्याआधी बाहेर आलेल्या या बातमीमुळे पाकिस्तान टीमच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

पाकिस्तान टीममध्ये फूट का पडली? हा प्रश्न आहे. पाकिस्तान टीमचे डायरेक्टर आणि विद्यमान कोच मोहम्मद हफीज यांच्या वर्तनामुळे वाद सुरु आहे. टीममधील सिनियर खेळाडू आणि कोचमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती आहे. कोच हफीज मोठ्या बैठका घेतो, त्यामुळे टीममध्ये नाराजी आहे. त्याचा परिणाम आता टीमच्या एकोप्यावर दिसून येतोय.

हे सुद्धा हाफीजच्या रागाच एक कारण

मोहम्मद हफीज मोठ्या बैठका घेतो, त्यामुळेच नातेसंबंध बिघडलेत हे एकमेव कारण नाहीय. खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल हफीजची भूमिका हे सुद्धा रागाच एक कारण आहे. पाकिस्तानी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना वर्कलोडची चिंता आहे. त्याशिवाय जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्यांना NOC हवी आहे. शाहीन आफ्रिदी, आजम खान, शादाब खान सारख्या खेळाडूंना ILT20 मध्ये खेळण्यासाठी NOC मिळाली आहे. पण त्यांनी जेव्हा, बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC मागितली, तेव्हा हफीज यांनी चालढकल सुरु केली.

….तर वाद आणखी वाढतील

पाकिस्तानी मीडियाने टीममधील सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती दिलीय त्यानुसार, खेळाडूंचे हफीज बरोबरचे संबंध बिघडले आहेत. परिस्थिती बदलली नाही, तर वाद आणखी वाढतील. एकूणच पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरु नाहीय.

बाबर आजमला हटवून काय साधलं?

टीममध्ये वाद असताना मैदानावरही त्याचा प्रत्यय दिसून येत आहे. नव्यावर्षात पाकिस्तानी टीम आधी ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंडसमोर हतबल दिसून येत आहे. एकूणच पाकिस्तानी टीममध्ये बदल झालेत, पण तरीही गोष्टी रुळावर आलेल्या नाहीत. बाबर आजम कॅप्टनशिपवरुन बाजूला झाल्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही.