
मास्टर्स लीग 2025 स्पर्धेतील सातवा सामना इंडिया मास्टर्स आणि दक्षिण अफ्रिका मास्टर्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि सचिन तेंडुलकरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकेला कमी धावांवर रोखता आलं. दक्षिण अफ्रिका मास्टर्स धडाधड विकेट पडल्या. 100 धावांच्या आत 9 गडी तंबूत परतले होते. पॉवर प्लेच्या पहिल्या चार षटाकत दक्षिण अफ्रिका संघाने चांगली सुरुवात केली. चार षटकात एकही विकेट न गमवता 35 धावा केल्या केल्या. त्यामुळे झटपट विकेट घेण्याचं भारतापुढे आव्हान होतं. कर्णधार सचिन तेंडुलकरने संघाचं पाचवं षटक राहुल शर्माच्या सोपवलं. राहुल शर्माचं हे दुसरं षटक होतं. त्याने पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्याने त्याच्याकडे पुन्हा चेंडू सोपण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या तीन चेंडूवरच त्याने दक्षिण अफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
हाशिम आमला स्ट्राईकला होता. त्याने पहिल्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जॅक कॅलिस मैदानात उतरला होता. त्यालाही पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. हॅटट्रीक चेंडूचा सामना करण्यासाठी रुडॉल्फ मैदानात आला. पण त्यालाही राहुल शर्माचा चेंडू कळला नाही आणि पायचीत होत तंबूत परतण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यालाही खातं खोलता आलं नाही.
𝐑𝐚𝐡𝐮𝐥, 𝐧𝐚𝐚𝐦 𝐭𝐨𝐡 𝐬𝐮𝐧𝐚 𝐡𝐨𝐠𝐚! 😎🎬
3️⃣rd time’s a charm indeed! Watch Rahul Sharma pull off the #IMLT20‘s first hattrick in style 🤙📈#TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/VGXxDlptzi
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 1, 2025
युवराज सिंगने 11 व्या षटकात दोन धक्के दिले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने व्हर्नन फिलँडरला बाद केले. पाचव्या चेंडूवर त्याने गार्नंट क्रुगरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पण सहाव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. त्यामुळे या स्पर्धेतील दुसरी हॅटट्रीक हुकली.
इंडिया मास्टर्स प्लेइंग इलेव्हन: सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (यष्टीरक्षक), गुरकीरत सिंग मान, स्टुअर्ट बिन्नी, युवराज सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, धवल कुलकर्णी, अभिमन्यू मिथुन, राहुल शर्मा.
दक्षिण आफ्रिका मास्टर्स प्लेइंग इलेव्हन: हाशिम अमला, जॅक रुडोल्फ, जॅक कॅलिस (कर्णधार), डेन विलास (यष्टीरक्षक), हेन्री डेव्हिड्स, फरहान बेहार्डियन, व्हर्नन फिलँडर, एडी लेई, गार्नेट क्रुगर, मखाया एन्टिनी, थंडी त्शाबालाला.