AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम

आयपीएल 2021 च्या या लिलाव प्रक्रियेसाठी (IPL 2021 Auction) फ्रँचायजींसह 292 खेळाडू उत्सुक आहेत.

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 18, 2021 | 10:51 AM
Share

IPL 2021 Auction Rules चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील खेळाडूंसाठीची लिलाव प्रक्रिया (IPL 2021 Auction) आज होत आहे. बोली प्रक्रियेच्या कार्यक्रमाला चेन्नईतील हॉटेल ग्रॅंड चोलामध्ये गुरुवारी 18 फेब्रुवारी दुपारी 3 पासून सुरुवात होणार आहे. या मिनी ऑक्शनमध्ये (Ipl Mini Auction 2021) एकूण 292 पैकी 62 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. (ipl 2021 auction rules 6 important rules for dc rr kxp mi rcb srh kkr csk)

आयपीएल 2021 च्या लिलावाच्या एक दिवसआधी सर्व फ्रँचायझीशी संबंधित व्यक्ती चेन्नईत पोहोचले आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग चेन्नई सुपर किग्ंजसकडून (Chennai Super Kings) या लिलावाच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन श्रेयस अय्यर हजर नसतील. या दोघांच्या जागी असिस्टंट कोच असलेला मोहम्मद कैफ हा या मिनी ऑक्शनसाठी उपस्थित असणार आहे. दरम्यान या लिलाव प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायजींना आयपीएल प्रशासनाच्या 6 नियमांचं पालन करावं लागणार आहे.

IPL Auction 2021 चे 6 नियम

नियम क्रमांक 1

कोणत्याही फ्रँचायजीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही. आयपीएल 2021 च्या लिलावासाठी चेन्नईकडे 19.9 कोटी, दिल्लीकडे 12.9 कोटी, पंजाबकडे 53.2 कोटी, कोलकाताकडे 10.75 कोटी, मुंबईकडे 15.35 कोटी, राजस्थानजवळ 34.85 कोटी, बंगळुरुकडे 35.9 कोटी तर हैदराबादजवळ 10 कोटी 75 लाख इतकी रक्कम उपलब्ध आहे. या नियमानुसार या सर्व फ्रँचायजींना या रक्कमेपेक्षा अधिक पैसे खर्च करण्याची परवानगी नसणार आहे.

75 टक्के रक्कम खर्चावी लागणार

BCCI आणि IPL गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार, सर्व फ्रँचायझींना एकूण रकमेच्या किमान 75 टक्के रक्कम ही खेळाडूंवर खर्च करणं बंधनकारक असणार आहे. कोणत्याही फ्रेंचायजीने 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम खर्च केल्यास उर्वरित रक्कम जप्त केली जाईल.

3 ) या वेळेस कोरोनामुळे मेगाऐवजी मिनी ऑक्शन कार्यक्रमाचं छोटेखानी आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे फ्रँचायजींना खेळाडूंना रिटेन करण्यासाठी RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्डचा वापर करता येणार नाही.

4) आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींना आपल्या संघात किमान 18 तर कमाल 25 खेळाडू ठेवता येणार आहेत. म्हणजेच 18 पेक्षा कमी किंवा 25 जास्त खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करता येणार नाही.

5) एका संघात कॅप्ड आणि अनकॅप्डसह (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू) भारतीय खेळाडूंची संख्या किमान 17 आणि कमाल 25 पर्यंत असू शकते.

6) एका संघात जास्तीत जास्त 8 आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा अधिक खेळाडू  समाविष्ट करता येणार नाहीत.

यंदा कोरोनामुळे मेगा ऑक्शनऐवजी मिनी ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. दर 3 वर्षांनी मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात येते. तर मिनी ऑक्शन त्या 3 वर्षात दरवर्षी होतो.

मिनी आणि मेगा, नेमका फरक काय?

मेगा ऑक्शनच्या आधी प्रत्येक फ्रँचायजीला जास्तीत जास्तीत 5 खेळाडू रिटेन करता येतात. तर मिनी ऑक्शनमध्ये कितीही खेळाडू रिटेन (कायम) करु शकतो.

संबंधित बातम्या :

 IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं

IPL 2021 : आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर उपलब्ध, बेस प्राईस किती?

Ab De Villiers मालामाल; धोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाई

 (ipl 2021 auction rules 6 important rules for dc rr kxp mi rcb srh kkr csk)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...