Ab De Villiers मालामाल; धोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाई

एबी डिव्हीलियर्सने आतापर्यंत आयपीएलमधून 91.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 व्या सिझनमधील अकरा कोटींचं मानधन धरुन हा आकडा 102.5 कोटींवर जाईल. (Ab De Villiers IPL 2021 Price)

Ab De Villiers मालामाल; धोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाई
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:44 PM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्स (Ab De Villiers) हा आयपीएलमधून (IPL) 100 कोटी रुपये कमवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. 14 व्या सिझनमध्ये खेळताच डिव्हीलियर्स हा मान मिळवेल. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने आधीच त्याला 11 कोटी रुपये किमतीला रिटेन केलं आहे. (Ab De Villiers IPL 2021 Price South African Cricketer will earn 100 crores in 14th season)

डिव्हीलियर्सचे आयपीएलमध्ये 169 सामने

एबी डिव्हीलियर्सने आतापर्यंत आयपीएलमधून 91.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 व्या सिझनमधील अकरा कोटींचं मानधन धरुन हा आकडा 102.5 कोटींवर जाईल. डिव्हीलियर्सने आतापर्यंत 169 सामने खेळले आहेत. यामध्ये 40.40 च्या सरासरीने त्याने 4 हजार 849 धावा ठोकल्या आहेत.

आधी बंगळुरु, मग दिल्ली

एबी डिव्हीलियर्सने 2008 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. दिल्ली डेअरडेवहिल्स (DD) संघाकडून तो आपला पहिला सिझन खेळला होता. त्यावेळी दिल्लीने 1.20 कोटी रुपयांन त्याला खरेदी केलं होतं. तीन सिझन्सनंतर 2011 मध्ये तो रॉयल चैलेंजर्स बंगळुरु संघात सहभागी झाला. डिव्हीलियर्सला RCB ने त्यावेळी पाच कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2011 पासून तो बंगळुरुकडूनच खेळत आला आहे.

तिघा ‘भारतीय’ कर्णधारांची अव्वल कमाई

आयपीएलमधून 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा एबी डिव्हीलियर्स हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनी, RCB चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुंबई इंडियन्स (MI) चा कप्तान रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा समावेश आहे. धोनी हा 14 व्या सिझननंतर 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणारा एकमेव खेळाडू ठरणार आहे. (Ab De Villiers IPL 2021 Price)

IPL 2021 च्या लिलावाचा मुहूर्त निश्चित

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाची अनेक क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत आहेत. या 14 व्या मोसमासाठीच्या लिलाव प्रक्रियेची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. ही लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला होणार (IPL 2021 Auction Date) आहे. हा कार्यक्रम चेन्नईमध्ये पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयपीएलने ट्विटद्वारे दिली आहे. या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया कधी होणार, याबाबत जोरदार चर्चा काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात सुरु होती. मात्र आयपीएलने तारीख जाहीर केल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळालं आहे.

या लिलाव प्रक्रियेसाठी काही दिवसांपूर्वी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली होती. तसेच काही संघांनी ट्रान्सफर विंडोद्वारे काही खेळाडूंची अदलाबदलही केली आहे.

14 व्या मोसमाचं आयोजन कुठे?

कोरोनामुळे 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. यामुळे आयपीएलच्या आगामी 14 पर्वाचं आयोजन कुठे होणार, हा मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता. आता कोरोना लस सापडली आहे. यामुळे या 14 मोसमाचं आयोजन हे नक्कीच भारतात केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं

(Ab De Villiers IPL 2021 Price South African Cricketer will earn 100 crores in 14th season)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.