IPL 2021: युजवेंद्र चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

| Updated on: Apr 19, 2021 | 12:27 PM

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 14 व्या पर्वातील 10 वा सामना अनेक प्रकारे विशेष ठरलाय. अशात धनश्री वर्माचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (IPL 2021: Dhanashree sheds tears as Yujvendra Chahal takes first wicket; Photo went viral on social media)

IPL 2021: युजवेंद्र चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 14 व्या पर्वातील 10 वा सामना अनेक प्रकारे विशेष ठरलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) या हंगामात विजयाची हॅटट्रिक ठोकली तर या सामन्यात आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yujvendra Chahal ) या मोसमातील पहिली विकेट घेतली. (IPL 2021: Dhanashree shed tears as Yujvendra Chahal takes first wicket; Photo went viral on social media)

धनश्री वर्माला अश्रू अनावर

महत्त्वाचं म्हणजे या मोसमातील तीन सामन्यांनंतर चहलनं जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या धनश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चहलला पहिली विकेट घेण्यासाठी या आयपीएल मोसमात तीन सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. सुरुवातीला दोन सामन्यात त्याला यश मिळालं नाही. मात्र कोलकातासोबत झालेल्या सामन्यात चहलनं धमाकेदार बॉलिंग केली.

धनश्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ग्लेन मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सची दमदार खेळी

केकेआर विरुद्धच्या सामन्यात चहलने 4 षटकांत 34 धावा देऊन 2 बळी घेतले. या सामन्यात त्यानं सलामीवीर नितीश राणा आणि संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक अशा महत्त्वाच्या विकेट घेतल्या. या सामन्यात बंगळुरूनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलनं 49 चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह 78 धावा केल्या तर डीव्हिलियर्सनं 34 चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 76 धावांची खेळी केली. यासह बंगळुरूनं 20 षटकांत 204 धावा आणि 4 विकेट अशी खेळी केली.

कोलकाताचा पराभव

लक्ष्याचा पाठलाग करत कोलकाताच्या संघानं 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या. तर या सामन्यासाठी डिव्हिलियर्सला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. यासह विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2021 मध्ये विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. पॉईंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता अव्वल स्थानी आहे.

संबंधित बातम्या

IPL 2021: आंद्रे रसेलने भर मैदानात एकदा नाही तर तब्बल पाचवेळा हरभजन सिंहची केली ‘बेइज्जती’, कारण वाचून हैराण व्हाल

10 कोटींची चिअर लीडर म्हणून हिणवलं, त्याच खेळाडूची फटकेबाजी पाहून ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूची पलटी