AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!

2016 च्या आयपीएल सिझनमध्ये 16 डावांत कोहलीने विक्रमी 973 रन्स केले होते. यावेळीही त्याच्याकडून अशाच बॅटिंगची बंगळुरुच्या चाहत्यांना तसंच संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहेत. पाहूयात विराटला कोणते विक्रम करण्याची संधी... IPL 2021 List of Record RCB Captain Virat Kohli

IPL 2021 : कोहलीला 'विराट' रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!
Virat Kohli
| Updated on: Apr 06, 2021 | 10:44 AM
Share

मुंबईआयपीएलच्या (IPL 2021) सलामीच्या सामन्याला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विरुद्ध बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातली ही टशन असणार आहे. अशावेळी या हंगामात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीजवळ काही रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. 2016 च्या आयपीएल सिझनमध्ये 16 डावांत कोहलीने विक्रमी 973 रन्स केले होते. यावेळीही त्याच्याकडून अशाच बॅटिंगची बंगळुरुच्या चाहत्यांना तसंच संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहेत. पाहूयात विराटला कोणते विक्रम करण्याची संधी… (IPL 2021 List of Record Royal Challengers Banglore Captain Virat Kohli)

टी ट्वे्न्टीमध्ये 10 हजार धावांपासून केवळ 269 रन्स पाठीमागे

विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्यापासून केवळ 269 धावा मागे आहे. या हंगामात तो 10 हजार धावा पूर्ण करु शकतो. विराटने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 9731 धावा केल्या आहेत. जर यंदाच्या हंगामात त्याने 269 धावा केल्या तर कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल.

6000 हजार रन्स करणारा पहिला बॅट्समन

आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा विराट कोहली पहिला बॅट्समन बनू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोहलीने 5878 धावा केल्या आहेत. आणखी 122 धावा केल्यावर कोहली हा खास पराक्रम करण्यात यशस्वी होईल.

200 आयपीएल मॅच खेळणारा खेळाडू

या मोसमात 8 सामने खेळताच कोहली आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा खेळाडू होईल. आतापर्यंत रोहित शर्मा आणि धोनी 200 हून अधिक आयपीएल सामने खेळले आहेत. तसंच, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि रवींद्र जडेजा हेदेखील या हंगामात 200 आयपीएल सामने पूर्ण करू शकतात. दिनेश कार्तिकने आतापर्यंत 196 सामने, सुरेश रैना 193 आणि रॉबिन उथप्पा याने आतापर्यंत 189 आयपीएल सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजाने आयपीएलचे 184 सामने खेळले आहेत.

50 फिफ्टी प्लस करणारा बॅट्समन

जर विराट कोहली आयपीएलच्या 6 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्यास यशस्वी ठरला तर आयपीएलच्या इतिहासात 50 फिफ्टी प्लस करणारा फलंदाज होईल.

(IPL 2021 List of Record Royal Challengers Banglore Captain Virat Kohli)

हे ही वाचा :

चिडक्या डिकॉकवर शोएब अख्तर भडकला, म्हणाला, ‘मला त्याच्या खेळभावनेवर शंका’, पाहा नेमकं प्रकरण काय…?

‘तुझा आवडता क्रिकेटर कोण?’, रिषभची मैत्रीण इशा नेगीचं ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ उत्तर, चाहते म्हणाले….

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी रिषभ पंत यशस्वीपणे पार पाडू शकतो?, रिकी पाँटिंगचं नेमकं उत्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.