IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी रिषभ पंत यशस्वीपणे पार पाडू शकतो?, रिकी पाँटिंगचं नेमकं उत्तर

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी रिषभ पंत यशस्वीपणे पार पाडू शकतो?, रिकी पाँटिंगचं नेमकं उत्तर
Ricky ponting And Rishabh Pant

अतिरिक्त जबाबदारीचा रिषभ पंत फायदा उठवेन. जबाबदारी पेलणं त्याला आवडतं. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची टीम चांगलं प्रदर्शन करेन, असा विश्वास दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगने व्यक्त केला आहे. (Ricky Ponting Reaction on Rishabh Pant Captaincy)

Akshay Adhav

|

Apr 06, 2021 | 9:02 AM

मुंबई : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shyeyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी 23 वर्षांच्या रिषभ पंतवर (Rishabh pant) संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मिळाले्या अतिरिक्त जबाबदारीचा रिषभ पंत फायदा उठवेन. जबाबदारी पेलणं त्याला आवडतं. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची टीम चांगलं प्रदर्शन करेन, असा विश्वास दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगने व्यक्त केला आहे. (IPL 2021 Delhi Capitals head Coach Ricky Ponting Reaction on Rishabh Pant Captaincy)

रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली. आयपीएलच्या 14 व्या मोसमात आता दिल्लीचं नेतृत्व रिषभच्या हाती देण्यात आलं आहे. त्याच्या नेतृत्वाला अधिक बळकट करण्यासाठी आणि त्याला नेतृत्वगुणांना विविध पैलू पाडण्याची जबाबदारी कोच म्हणून रिकी पाँटिंगवर आहे. यावर बोलताना रिकी म्हणाला, “मी त्याची प्रत्येक वेळी मदत करायला तयार आहे. पण मला वाटतं की त्याला फार मदतीची गरज भासणार नाही. तो खूपच सक्षम आहे”

त्याच्यावर दाखवलेला विश्वास तो सार्थ करुन दाखवेल

नवनियुक्त कर्णधाराला मार्गदर्शन करणं हे कोच आणि संघातील सिनियर्स खेळाडूंचं काम असते. रिषभला योग्य वेळी मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. तरीही रिषभला फार काही सांगावं लागणार नाही. त्याला नेतृत्व करायला, जबाबदारी घ्यायला आवडते. त्यामुळे त्याच्यावर दाखवलेला विश्वास तो सार्थ करुन दाखवेल, अशी आशा रिकीने व्यक्त केला.

स्पर्धा सुरु होण्याअगोदर रिषभच्या कर्णधापपदाविषयी तसंच त्याच्यावर दिलेल्या जबाबदारीविषयी अधिक बोलणं योग्य होणार नाही. स्पर्धेच्या अगोदरच आपण त्याच्यावर सुचनांचं ओझं टाकणं बरोबर नाही, असंही रिकी पाँटिंग म्हणाला.

पंतच्या आक्रमक अंदाजाचा फायदा होईल

रिषभ पंतने गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलंय. आयपीएलमधील इथून पुढचे 2 महिने त्याच्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. कर्णधार नसतानाची रिषभची बॅटिंग कर्णधार म्हणून खेळताना देखील बघायला मिळेल, अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

(IPL 2021 Delhi Capitals head Coach Ricky Ponting Reaction on Rishabh Pant Captaincy)

हे ही वाचा :

IPL 2021 : यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा? पाहा पाठीमागच्या वर्षी धोनी काय म्हणाला होता?

IPL 2021 : ‘कॅप्टन माही’चा धडाकेबाज अवतार, सराव करताना एका हाताने षटकार, व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नर म्हणाला ‘बोअर होतंय…’, रोहित म्हणाला, ‘का बरं, Tik Tok ला मिस करतोय?’ दोन खेळाडूंमधला मजेशीर संवाद!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें