चिडक्या डिकॉकवर शोएब अख्तर भडकला, म्हणाला, ‘मला त्याच्या खेळभावनेवर शंका’, पाहा नेमकं प्रकरण काय…?

चिडक्या डिकॉकवर शोएब अख्तर भडकला, म्हणाला, 'मला त्याच्या खेळभावनेवर शंका', पाहा नेमकं प्रकरण काय...?

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर चांगलाच भडकला. त्याने डिकॉकच्या खेळ भावनेवर शंका व्यक्त करत डिकॉकने वर्तनावर टीका केली. Shoaib Akhtar pakistan vs South Africa 2nd One Day Match

Akshay Adhav

|

Apr 06, 2021 | 10:04 AM

मुंबई :  दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने (quinton de kock) रडका खेळ केला. त्याने पाकिस्तानी फलंदाज फकर झमानला (Fakhar Zaman) गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सकडे भलता इशारा केला. त्यामुळे झमानला 193 धावांवर तंबूत जावं लागलं. त्याचं दुहेरी शतक केवळ 7 धावांनी हुकलं. या सगळ्या प्रकरणावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर चांगलाच भडकला. त्याने डिकॉकच्या खेळ भावनेवर शंका व्यक्त करत डिकॉकने जे काही वर्तन केलं ते बरोबर केलं नसल्याचं सांगत त्याच्यावर टीका केलीय. (Shoaib Akhtar Disappointed quinton de kock behaviour Fakhar Zaman Miss Double Century pakistan vs South Africa 2nd One Day Match)

शोएब अख्तर काय म्हणाला…?

शोएब अख्तरने डिकॉकच्या खेळ भावनेवर शंका व्यक्त करत त्याला फैलावर घेतलं. डिकॉरने फखर झमानबरोबर योग्य वर्तन केलं नाही. त्याचं वर्तन खेळभावनेच्या विरोधी आहे. या अशा प्रकरणांसंबंधी नियमही बनवले गेले आहेत. ज्यानुसार अशा प्रकारचं कृत्य केलं तर 5 रन्सची पेनल्टी आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागतो. पण मॅच रेफ्रींनी अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली नाही, असं शोएब म्हणाला.

त्याला अशा पद्धतीने बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी त्रासदायक

मला फखर झमानचं दुहेरी शतक पाहायचं होतं. तो ज्या पद्धतीने खेळत होता ते पाहणं अद्भुत होतं. त्याने लाजवाब बॅटिंग केली. त्याला अशा पद्धतीने रन आऊट होताना पाहून मला खूप वाईट वाटल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी नमवलं. परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने (Fakhar Zaman) ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्याने क्रिकेट वेड्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फिटलं. त्याने 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्यांचं द्विशतक केवळ 7 धावांनी हुकलं आणि त्याला कारणीभूत ठरला दक्षिण आफ्रिकेचा चलाख, चतुर विकेट कीपर क्विंटन डिकॉकचा (Quinton de kock) तो एक इशारा…!

मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन बोलर्सने त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन बोलर्सची डाळ शिजू दिली नाही. संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. 190 धावा क्रॉस केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. 50 व्या ओव्हर्सच्या  पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.

डिकॉकचा प्लॅन फत्ते, फकरची झुंजार इनिंग संपुष्टात

डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला…. फकरची 193 धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली…! डिकॉकची फेक फिल्डिंग कामाला आली. फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

(Shoaib Akhtar Disappointed quinton de kock behaviour Fakhar Zaman Miss Double Century pakistan vs South Africa 2nd One Day Match)

हे ही वाचा :

चिडक्या क्विंटन डी कॉकला आयसीसीने दाखवला इंगा, आता ‘असं’ काही करण्याअगोदर तो लक्षात ठेवेन…!

Video : क्विंटन डिकॉकची चतुर खेळी, ‘त्या’ एका इशाऱ्याने फकरची झुंजार इनिंग संपवली, द्विशतक 7 धावांनी हुकलं!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें