AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिडक्या क्विंटन डी कॉकला आयसीसीने दाखवला इंगा, आता ‘असं’ काही करण्याअगोदर तो लक्षात ठेवेन…!

डिकॉकच्या चिडक्या खेळीवर सगळीकडून टीका होत असताना आता आयसीसीने देखील डिकॉकला इंगा दाखवलाय. ICC take Action against quinton de kock

चिडक्या क्विंटन डी कॉकला आयसीसीने दाखवला इंगा, आता 'असं' काही करण्याअगोदर तो लक्षात ठेवेन...!
क्विंटन डिकॉक याच्यावर आायसीसीने केली कारवाई
| Updated on: Apr 05, 2021 | 12:44 PM
Share

मुंबई :  दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने (quinton de kock) रडका खेळ केला. त्याने पाकिस्तानी फलंदाज फकर झमानला (Fakhar Zaman) गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सकडे भलता इशारा केला. त्यामुळे झमानला तंबूत जावं लागलं. डिकॉकच्या चिडक्या खेळीवर सगळीकडून टीका होत असताना आता आयसीसीने (ICC) देखील डिकॉकला इंगा दाखवलाय. (South Africa vs pakistan ICC Action against quinton de kock Over Fakhar Zaman Runs Out miss Double century)

डिकॉकच्या मॅच फी मधून 75 रक्कम कापण्याचा निर्णय, तर आफ्रिकन कर्णधारालाही दंड

डिकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे त्याला तसंच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला आयसीसीने दंड ठोठावला आहे. डिकॉकच्या मॅच फीसच्या 75 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिकन कर्णधार  टेंबा बवुमा यांच्या मॅचमधून 20 टक्के रक्कम कापण्याचा आयसीसीने निर्णय घेतला आहे.

ICC Action against quinton de kock

ICC Action against quinton de kock

नेमकं प्रकरण काय, आयसीसीने असा निर्णय नेमका काय घेतला?

क्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी नमवलं. परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने (Fakhar Zaman) ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्याने क्रिकेट वेड्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फिटलं. त्याने 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्यांचं द्विशतक केवळ 7 धावांनी हुकलं आणि त्याला कारणीभूत ठरला दक्षिण आफ्रिकेचा चलाख, चतुर विकेट कीपर क्विंटन डिकॉकचा (Quinton de kock) तो एक इशारा…!

मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन बोलर्सने त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन बोलर्सची डाळ शिजू दिली नाही. संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. 190 धावा क्रॉस केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. 50 व्या ओव्हर्सच्या  पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.

डिकॉकचा प्लॅन फत्ते, फकरची झुंजार इनिंग संपुष्टात

डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला…. फकरची 193 धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली…! डिकॉकची फेक फिल्डिंग कामाला आली. फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

(South Africa vs pakistan ICC Action against quinton de kock Over Fakhar Zaman Runs Out miss Double century)

हे ही वाचा :

IPL 2021 : IPL सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार की नाही?, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स, तरीही 4 वर्षापासून संघात जागा नाही, अमित मिश्रा भडकला, म्हणतो, ‘मी काय करावं…?’

IPL 2021 : लग्नानंतर बुमराहचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन, घातक यॉर्करने दांडी गुल, मुंबईकडून व्हिडीओ शेअर!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.