AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांनी लखनौ सुपर जायंट्स संघाला हरवलं. आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. RCB ने लखनौला 18 धावांनी हरवलं. यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?
फाफ डु प्लेसिसImage Credit source: IPL
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 20, 2022 | 7:26 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांनी लखनौ सुपर जायंट्स संघाला हरवलं. आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. RCB ने लखनौला (LSG) 18 धावांनी हरवलं. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसी आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने विजयात महत्त्वची भूमिका बजावली. डू प्लेसीने (Faf du Plessis) चार बाद 62 अशा स्थितीतून डाव सावरला. त्याच्या 96 धावांच्या खेळीच्या बळावर RCB ने 181 धावांपर्यंत मजल मारली. बँगलोरने लखनौला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट दिले होते. त्यांनी निर्धारीत 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या. जोश हेझलवूडने लखनौला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकात 25 धावा देत चार विकेट घेतल्या. यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

ऑरेंज कॅपच्या यादीत जोस बटल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 375 धावा काढल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 265 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर येतो फाफ डु प्लेसिस. डु प्लेसिस याने 250 धावा काढल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. श्रेयसनं 236 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. पाचव्या स्थानी हार्दिक पंड्या आहे. त्याने 228 धावा काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

दोघेही एकाच गुरुचे चेले

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट रनआऊट झाला. त्यानंतर फॅन्सनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. सलामीवीर अनुज रावतने दुष्मंथा चमीराला पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार मारला होता. पण चमीराने पाचव्या चेंडूवर रावतला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पुढच्याच चेंडूवर चमीराने विराट कोहलील बाद केलं. विराट कोहली आणि अनुज रावत दोघेही एकाच गुरुचे चेले आहेत. विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनीच अनुज रावतलाही क्रिकेटचे धडे दिलेत. दोघेही वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीतून येतात. पहिल्याच ओव्हरमध्ये चमीराने दोघांना पाठोपाठ तंबूत पाठवलं.

इतर बातम्या

Zodiac| खूप हुशार असतात या 3 राशीचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का ?

Badlapur CCTV: दिवसाढवळ्या दुकानात शिरला, दुकानाचील ड्रॉव्हरमधून 1 लाख 20 हजार चोरुन पोबारा

Lal fort : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिलला लाल किल्ल्यावरुन भाषण करणार आहेत; भाजपसाठी ते महत्वाचच आहे, कारण…

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार