Arjun Tendulkar Debut IPL 2022: ‘अर्जुन लय भारी रे’, इनफॉर्म जोस बटलरला परफेक्ट यॉर्कर टाकणार? पहा VIDEO

| Updated on: Apr 28, 2022 | 9:11 AM

Arjun Tendulkar Debut IPL 2022: पुढच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात बदल होऊ शकतात व युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. बदल झाल्यास अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता जास्त वाटते.

Arjun Tendulkar Debut IPL 2022: अर्जुन लय भारी रे, इनफॉर्म जोस बटलरला परफेक्ट यॉर्कर टाकणार? पहा VIDEO
Mumbai Indians Arjun Tendulkar
Image Credit source: ipl/bcci
Follow us on

मुंबई: यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) खूपच खराब कामगिरी केली आहे. सलग आठ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. मुंबई अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. प्लेऑफमधून (Play off) मुंबईचं आव्हान केव्हाच संपुष्टात आलय. आता फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवणं, हेच मुंबई संघासमोरच लक्ष्य आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात मुंबई इंडियन्सला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा, इशान किशन फ्लॉप ठरलेत. गोलंदाजीत एकट्या जसप्रीत बुमराहवर (Jasprit bumrah) सगळा भार आहे. जसप्रीत बुमराहला साथ देऊ शकेल, असा दुसरा एकही गोलंदाज संघात नाहीय. त्यामुळे यंदाचा अख्खा सीजनचं मुंबईला देवाला वाहिलाय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. मुंबई या लढतीत अर्जुन तेंडुलकरला संधी देऊ शकते.

मुंबई इंडियन्सच्या संघात बदल दिसणार

मागच्या काही सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकरच्या डेब्युची चर्चा सुरु आहे. पण अजून त्याला संधी मिळालेली नाही. अर्जुन प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचे मार्गदर्शक सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आहे. पुढच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात बदल होऊ शकतात व युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. बदल झाल्यास अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता जास्त वाटते.

परफेक्ट फॉलो थ्रू एक्शन

मुंबई इंडियन्सने बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजी करतानाच एक व्हिडिओ पोस्ट केलाय. “परफेक्ट फॉलो थ्रू एक्शन से चार्ज, अर्जुन लय भारी रे” असं कॅप्शन त्या व्हिडिओला दिलय. मुंबई इंडियन्स उर्वरित सहा सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंना आजमवून पाहण्याची शक्यता आहे. याआधी सुद्धा मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अर्जुनचा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण तेव्हा संधी मिळाली नव्हती. 22 वर्षाचा अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कधी?

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 30 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. उर्वरित सामन्यांमध्ये दमदार खेळ दाखवून मोसमाचा चांगला शेवट करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल