AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Arjun Tendulkar ला संधी द्या, नशीब बदलेल, मोठ्या खेळाडूचा Mumbai Indians ला सल्ला

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा आज चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईसाठी हा 'करो या मरो' सामना आहे. मुंबई इंडियन्सचा सलग सहा सामन्यात पराभव झाला आहे.

IPL 2022: Arjun Tendulkar ला संधी द्या, नशीब बदलेल, मोठ्या खेळाडूचा Mumbai Indians ला सल्ला
Arjun Tendulkar (PC : Instagram)
| Updated on: Apr 21, 2022 | 4:03 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सचा आज चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईसाठी हा ‘करो या मरो’ सामना आहे. मुंबई इंडियन्सचा सलग सहा सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे ‘प्लेऑफ’ मधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला आजच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. आजच्या सामन्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammed Azharuddin) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीम मॅनेजमेंटला एक सल्ला दिला आहे. आज होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्माचा संघात समावेश करण्याची मागणी केली आहे. “तुम्ही काही नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे. अर्जुन तेंडुलकरला संधी देऊ शकता. तो सध्या चांगली कामगिरी करतोय. तेंडुलकर नावामुळे कदाचित नशीब बदलेल, चांगले दिवस सुरु होतील” असं मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला.

तो त्या खेळाडूंबरोबर अन्याय ठरेल

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने बेस प्राइस पेक्षा जास्त दहा लाख रुपये मोजून अर्जुनला आपल्या ताफ्यात घेतलं. अर्जुनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये मोजले. “तुमच्याकडे खेळाडू असतील, तर तुम्ही त्यांना बसवून ठेवणं योग्य नाही. तो त्या खेळाडूंबरोबर सुद्धा अन्याय ठरेल. जर मनासारख्या गोष्टी घडत नसतील, तर तुम्ही दुसऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकता. अनेक संघांना या नव्या खेळाडूंबद्दल माहित नाहीय. संघ यशस्वी ठरु शकतो” असं मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले.

मुंबई कधी जिंकणार?

यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची खूप खराब कामगिरी सुरु आहे. ते अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबई इंडियन्सचा मागच्या सहा सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुनला एक संधी देऊन पहायला हरकत नाही. यंदा जसप्रीत बुमराह वगळता एकाही गोलंदाजाला आपली छाप उमटवता आलेली नाही.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.