IPL Final 2023 | महाअंतिम सामन्यात हायव्होल्टेज थरार, शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा काय काय झालं?

| Updated on: May 30, 2023 | 8:36 AM

तब्बल 2 दिवसांनंतर आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना पूर्ण झाला. चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काय ड्रामा झाला तु्म्ही पाहिलात का?

IPL Final 2023 | महाअंतिम सामन्यात हायव्होल्टेज थरार, शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा काय काय झालं?
Follow us on

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना हा पावसामुळे राखीव दिवशी 29 मे रोजी खेळवण्यात आला. या राखीव दिवशीही पावसाने खोडा घातला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचा सुधारित आव्हान मिळालं. चेन्नईने हे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सामना क्षणाक्षणाला बदलत होता. कधी चेन्नई जिंकतेय कधी गुजरात टायटन्स जिंकतेय असं वाटत होतं. एक एक बॉल जसा कमी होत होता, तसं तसं क्रिकेट चाहत्यांचा बीपी वाढत होता. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या म्हणजेच 15 व्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. मोहितने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यातच जमा होता. मात्र रविंद्र जडेजाच्या मनात दुसरंच काही होतं.

चेन्नईला शेवटच्या 2 बॉलवर विजयासाठी 10 धावांची गरज असताना जडेजाने सिक्स आणि फोर ठोकलं. जडेजाने चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन केलं.

जडेजाने 15 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स ठोकला. त्यामुळे आता चेन्नईला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज होती. जडेजाने चौकार ठोकला. चेन्नई कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचा अपवाद वगळता पूर्ण टीम मैदानात सुस्साट धावत गेली. धोनीने आपले डोळे बंद करुन घेतले. मात्र चेन्नईचा विजय होताच, धोनीसुद्धा विजयी जल्लोष करण्यासाठी मैदानात गेला.

शेवटच्या ओव्हरचा थरार

शेवटच्या ओव्हरचा थरार

चेन्नईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 13 धावा पाहिजे होत्या. चेन्नईकडून शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हा जोडी मैदानात होती. तर गुजरातकडून मोहित शर्मा ओव्हर टाकत होता.

पहिला बॉल – डॉट

दुसरा बॉल – सिंगल

तिसरा बॉल – सिंगल

चौथा बॉल – सिंगल

स्ट्राईकवर रविंद्र जडेजा आला. मोहितने हुशारीने या दोन्ही घातक गोलंदाजांना बांधून ठेवलं. आता 2 मध्ये 10 धावांची गरज होती. पाचवा बॉलवरुन सामन्याचा निकाल स्पष्ट होणार होता. मात्र जडेजाने खणखणीत सिक्स खेचला. त्यामुळे आता विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. जडेजाने या सहाव्या बॉलवर चौकार ठोकला. चेन्नई अशाप्रकारे पाचव्यांदा चॅम्पियन झाली.

धोनीने जड्डूला उचलून घेतलं

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.