Rinku Singh याची Team Indian साठी खेळायची इच्छा नाही?

| Updated on: May 21, 2023 | 6:56 PM

कोलकाता नाईट रायडर्स टीमचा स्टार बॅट्समन रिंकून सिंह याने फिनिशर म्हणून आपली छाप सोडली. टीम इंडियाकडून खेळण्याबाबत रिंकू काय म्हणाला जाणून घ्या

Rinku Singh याची Team Indian साठी खेळायची इच्छा नाही?
Follow us on

पश्चिम बंगाल | टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटरचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. आयपीएलमुळे अनेक युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल प्रत्येक मोसमात अनेक स्टार खेळाडू आपल्या कामगिरीने छाप सोडतात. यंदा ती कामगिरी रिंकू सिंह याने करुन दाखवली. रिंकू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. रिंकूने 20 मे रोजी लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात झुंजार 67 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र अवघ्या 1 रनसाठी रिंकूचे प्रयत्न अपुरे ठरले. लखनऊने 1 रनच्या फरकाने केकेआरवर मात करत प्लेऑफमध्ये धडक मारली.

रिंकूच्या या काही शानदार खेळीनंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र टीम इंडियाकडून खेळण्याबाबत रिंकूला काय वाटतं, हे आपण जाणून घेऊयात.

रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलवर 5 सिक्स मारत केकेआरला विजय मिळवून दिला. तेव्हापासून रिंकू खऱ्या अर्थाने चमकला. रिंकूचा बेस्ट फिनीशर म्हणून उदय झाला. मात्र जेव्हा रिंकूला टीम इंडियाकडून खेळण्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो काय म्हणाला जाणून घेऊयात. टीम इंडियाकडून खेळण्याबाबत मी सध्या विचार करत नसल्याचं रिंकूनं म्हटलंय.

रिंकू काय म्हणाला?

” अशा प्रकारच्या कामगिरीनंतर कोणलाही चांगलंच वाटेल. पण मी सध्या इतक्या दूरचं विचार करत नाही. माझी टीम इंडियात निवड होईल, याबाबत मी विचार करत नाही”, असं रिंकूने स्पष्ट केलं. शनिवारी लखनऊ विरुद्धच्या सामन्यानंतर रिंकू परिषदेत उपस्थित होता. यावेळेस रिंकूने अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळेस रिंकू बोलत होता.

रिंकू सिंह याची आयपीएल 2023 मधील कामगिरी

रिंकू सिंह याने आयपीएल 16 व्या मोसमात केकेआरकडून 14 सामन्यात खेळला. रिंकूने या सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरी आणि 149.53 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. रिंकूने या खेळीत 31 फोर आणि 29 सिक्स ठोकले. तसेच 4 अर्धशतकंही लगावली. लखनऊ विरुद्धची नाबाद 67 धावांची खेळी ही रिंकूच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.