IPL 2023 CSK vs SRH : पहिल्यांदा धक्का, मग रागानं पाहिलं..! विकेट घेतल्यानंतरही रवींद्र जडेजाचा राग अनावर, पाहा Video

IPL 2023 : आयपीएल स्पर्धा आता मध्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. जीव ओतून खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे मैदानात तू तू मै मै पाहायला मिळत आहे. असंच काही हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामन्यात पाहायला मिळालं.

IPL 2023 CSK vs SRH : पहिल्यांदा धक्का, मग रागानं पाहिलं..! विकेट घेतल्यानंतरही रवींद्र जडेजाचा राग अनावर, पाहा Video
IPL 2023 CSK vs SRH : तुझी नी माझी खुन्नस..! क्लासन आणि जडेजाची तू तू मै मै, नेमकं काय झालं पाहा Video
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2023 | 10:27 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रवींद्र जडेजा चांगलाच फॉर्मात आहे. अष्टपैलू खेळीमुळे संघाला त्याची चांगली मदत होत आहे. रवींद्र जडेजाने सनराईजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही चांगली कामगिरी करत आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याच्या फिरकीचा सामना करताना हैदराबादच्या खेळाडूंना चांगलं अवघड गेलं. या सामन्यात रवींद्र जडेजाने 4 षटकात 22 धावा देऊन तीन महत्त्वाचे गडी बाद केले.त्यात हेनरिक क्लासन आणि त्याच्यात भर मैदानात तू तू मै मै पाहायला मिळाली. नेमकं काय झालं या दोघांमध्ये असा प्रश्न तेव्हा प्रेक्षकांना पडला होता.

एक धक्का आणि पाच चेंडूपर्यंत ठसन

महेंद्रसिंह धोनीने संघाचं 13 षटक रवींद्र जडेजाच्या हाती सोपवलं. तेव्हा रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्याची संधी चालून आली. पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवालने समोर मारला आणि रवींद्र जडेजाच्या हाती झेल दिला. पण हा झेल नॉन स्ट्राइकला उभा असलेल्या हेनरिक क्लासनकडे गेला.

क्लासनने यावेळी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जडेजाने विकेट घेण्यासाठी डाव्या बाजूला गेला. मात्र या प्रयत्नात दोघांची टक्कर झाला आणि झेल सुटला. हातून इतका सोपा झेल सुटल्याने रवींद्र जडेजा चांगलाच संतापला. त्यानंतर तो क्लासनकडे रागानेच बघत राहीला.

पुढच्या तीन चेंडूत क्लासन आणि जडेजाने स्ट्राइक रोटेट केली आणि प्रत्येक वेळी जडेजा क्लासनला रागाने पाहात राहीला. मयंक अग्रवाल या जीवदानाचा काहीच फायदा उचलू शकला नाही. पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवालला यष्टीचीत केलं. मात्र इतकं करूनही त्याचा राग शांत झाला नाही. तो क्लासनकडे रागाने बघून काहीतरी पुटपूटत होता.

दोन्ही संघांचे खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक