RCB Disqualify : आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर नवीन उल हकनं विराटला पुन्हा डिवचलं, अशी ठेवली इन्स्टास्टोरी Watch Video

| Updated on: May 22, 2023 | 2:11 AM

आयपीएल 2023 स्पर्धेत आरसीबी संघ आणि विराट कोहलीचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलं आहे. प्लेऑफसाठी महत्त्वपूर्ण सामन्यात पराभव झाल्याने आव्हान संपुष्टात आलं आहे. पण आरसीबीच्या पराभवानंतर लखनऊचा नवीन उल हक भलताच खूश झाला आहे.

RCB Disqualify : आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर नवीन उल हकनं विराटला पुन्हा डिवचलं, अशी ठेवली इन्स्टास्टोरी Watch Video
RCB Disqualify : आरसीबीच्या पराभवानंतर लखनऊचा नवीन उल हक भलताच खूश, विराटला डिवचत ठेवली अशी इन्स्टास्टोरी Watch Video
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचं पाणी पाजल्याने प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातसमोर विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गुजरातने 4 गडी गमवून 19.1 षटकात पूर्ण केलं. बंगळुरुच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये संधी मिळाली आहे. असं असताना बंगळुरुच्या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल हक भलताच खूश झाला आहे. त्याची इन्स्टास्टोरी सध्या चर्चेत आहे. त्याचं ही स्टोरी विराटला डिवचण्यासाठीच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव झाल्यानंतर काही मिनिटातचं नवीन उल हकने ही इन्स्टास्टोरी ठेवली आहे. त्यात विराट आणि नवीन उल हक यांच्यातील भांडण सर्वश्रूत आहे. त्यामुळे ही इन्स्टास्टोरी विराट कोहलीला डिवचण्यासाठी ठेवल्याचं बोललं जात आहे.

नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यात वाद झाला होता. यानंतर गौतम गंभीर आणि विराट यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. या वादानंतर विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर एकमेकांना सोशल मीडियावरून अप्रत्यक्षरित्या डिवचत होते. आता आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाद झाल्यानंतर नवीन उल हकने विराट कोहलीला डिवचल्याचं बोललं जात आहे.

नवीन उल हकची क्रिकेट कारकिर्द

23 सप्टेंबर 1999 रोजी नवीन उल हकचा जन्म झाला. 2016 मध्ये त्याने बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये टी 20 क्रिकेटचा पहिला सामना खेळला. त्यानंतर 19 एप्रिल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये डेब्युची संधी मिळाली. नवीन उल हक अफगाणिस्तानसाठी 7 वनडे आणि 27 टी 20 सामने खेळलाय.

लखनऊ विरुद्ध मुंबई प्लेऑफ सामना

लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात प्लेऑफचा सामना रंगणार आहे. 24 मे रोजी हा सामना असणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा सामना चेन्नई आणि गुजरात या दोन संघातील पराभूत संघाशी होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे.

लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.