
Rohit Sharma IPL 2023 : IPL 2023 मध्ये रोहित शर्मासाठी काहीच चांगल चालू नाहीय. 16 व्या सीजनच्या निम्म्या प्रवासात बॅटिंग आणि कॅप्टनशिपमध्ये रोहित विशेष प्रभाव पाडू शकलेला नाही. रोहितची स्थिती खराब आहे. त्याच हे प्रदर्शन पाहून लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माला एक सल्ला दिलाय. गुजरात आणि मुंबईची मॅच संपल्यानंतर ब्रॉडकास्ट चॅनलवर विश्लेषण करताना सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माबद्दल आपले विचार व्यक्त केले.
मंगळवारी 25 एप्रिलला गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव झाला.
गावस्करांनी काय सल्ला दिलाय?
मुंबई इंडियन्सचा पराभव आणि रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहून सुनील गावस्कर यांना वाईट वाटलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपर्यंत फिट होण्यासाठी रोहित शर्माने ब्रेक घेतला पाहिजे, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलय. रोहितला त्यांनी पूर्ण सीजनसाठी ब्रेक घ्यायला सांगितलेला नाही. फक्त काही सामने बाहेर रहायला सांगितलय. शेवटच्या काही सामन्यांसाठी रोहित शर्माने पुन्हा मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल व्हावं, असा गावस्करांनी सल्ला दिलाय.
रोहित शर्माचा फ्लॉप शो
IPL 2023 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला आपला धाक निर्माण करता आलेला नाहीय. मुंबईच्या टीमने आतापर्यंत 7 सामने खेळलेत, त्यात 3 मॅचमध्ये विजय मिळवलाय. 4 सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागलाय. रोहित शर्माची बॅटिंग सुद्धा अपेक्षित होत नाहीय. कॅप्टन रोहित शर्माने चालू आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये पहिल्या 7 सामन्यात 134 धावा केल्या आहेत. यात 1 अर्धशतक आहे.
फॉर्मसाठी नाही, तर या कारणासाठी दिला ब्रेक घेण्याचा सल्ला
रोहितच्या या प्रदर्शनावर गावस्कर खुश नाहीयत. रोहितचा फॉर्म हा गावस्करांसाठी चिंतेचा विषय नाहीय. त्याचा फिटनेस गावस्करांना महत्वाचा वाटतो. म्हणूनच त्यांनी रोहितला आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय.
WTC ची फायनल कधी होणार?
लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. यात भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम आमने-सामने असेल. WTC फायनलसाठी टीम इंडियाने आपली 15 सदस्यीय टीम निवडली आहे. त्याच नेतृत्व रोहित शर्माच्या हातात आहे.