
IPL Winner Prize Money : IPL 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने धडक दिल्यानंतर आता त्यांच्या विरुद्ध कोणता संघ खेळणार हे आज निश्चित होणार आहे. अहमदाबादमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरु आहे. जो संघ आज जिंकेल तो आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. 28 मे रोजी आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएलच्या विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार आहे. याबाबत अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना किती रक्कम मिळणार आहे हे देखील जाणून घेऊया.
विजेत्या संघाला किती कोटी?
आयपीएल 2023 च्या फायलन सामन्यात जो संघ बाजी मारेल त्या संघाला 20 कोटी रुपये (IPL 2023 Prize Money) मिळणार आहे. ही जगातील सर्वाधिक रक्कम आहे जी टी२० लीगमध्ये दिली जातेय. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहे. आयपीएल 2023 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघाना 7-7 कोटी रुपये मिळणार आहेत.
ऑरेंज आणि पर्पल कॅप पुरस्कार
आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. पण यासोबत त्यांना एक मोठी रक्कम देखील बक्षीस म्हणून दिली जाते. यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात.
आयपीएल 2023 सुपर स्ट्राइक आणि इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड
सुपर स्ट्राइक अवॉर्ड जिंकणाऱ्या खेळाडूला देखील 15 लाख रुपये दिले जातात. इमर्जिंग प्लेयर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला 20 लाख रुपये मिळणार आहे. अशा प्रकारे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन खेळाडू लाखो रुपये कमवतात.
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. यंदाचा हा 16वा सीजन आहे. आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. याआधी फायनल जिंकणाऱ्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळत होते. पण आता ही रक्कम २० कोटी रुपये झाली आहे. मागच्या वर्षी गुजरात टाइटन्स संघाला देखील ट्रॉफी जिंकल्यानंतर 20 कोची रुपये मिळाले होते.