IPL 2024 GT vs CSK Live Streaming : गुजरात चेन्नईला पराभूत करुन प्लेऑफचं गणित बिघडवणार?

Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Streaming : गुजरात विरुद्ध चेन्नई दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत.

IPL 2024 GT vs CSK Live Streaming : गुजरात चेन्नईला पराभूत करुन प्लेऑफचं गणित बिघडवणार?
ruturaj gaikwad and shubman gill csk vs gt ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 3:22 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 57 सामने पार पडले आहेत. त्यानंतरही प्लेऑफमध्ये एकही संघाने क्वालिफाय केलेलं नाही. सनरायजर्स हैदराबादने 57 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. त्यानंतर मुंबई या हंगामातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. आता उर्वरित 9 संघांमध्ये 4 जागांसाठी जोरदार चुरस आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक सामना हा अतिशय अटीतटीचा असणार आहे. या हंगामातील 59 व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. चेन्नईच्या तुलनेत गुजरातला प्लेऑफची संधी कमी आहे. मात्र गुजरातकडे मागील पराभवाचा वचपा घेत चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग खडतर करण्याची दुहेरी संधी आहे.

उभयसंघात या आधी 26 मार्च रोजी सामना झाला होता. तेव्हा चेन्नईने गुजरातवर 63 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता गुजरात चेन्नईला पराभूत करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि गुजरात सर्वात शेवटी 10 व्या स्थानी आहे. चेन्नईने 11 पैकी 6 सामन्यात विजय मिळवलाय. तर गुजरात 11 पैकी 4 सामन्यात यशस्वी ठरलीय. त्यामुळे आता गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यात कोण यशस्वी होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना शुक्रवारी 10 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर बघायला मिळेल.

गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अरावेली अवनीश, महेंद्रसिंह धोनी, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दूल ठाकुर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.