IPL 2024, GT vs CSK : चेन्नई आणि गुजरात संघातील कोणते खेळाडू ठरतील बेस्ट! जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील 59वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर गुजरात टायटन्स आता उर्वरित सामने आत्मसन्मानासाठी खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजय सहजासहजी मिळणार नाही.

IPL 2024, GT vs CSK : चेन्नई आणि गुजरात संघातील कोणते खेळाडू ठरतील बेस्ट! जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 5:48 PM

आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरु झाला असून प्लेऑफसाठी लढत सुरु आहे. अजूनही कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं नाही. गणिती भाषेत कोलकाता आणि राजस्थानचं स्थान पक्कं आहे. पण त्यातही टॉप 4 मध्ये दोलयामान स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आयपीएल स्पर्धेतील 59वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय चेन्नईसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफचं गणित सोडवायचं तर हा विजय आवश्यक आहे. पण चेन्नईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र पुढचं खूपच कठीण होऊन बसेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित सामने आत्मसन्मानासाठी लढताना दिसेल.

आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी एकमेकांना 3 वेळा पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ या वर्षी 26 मार्चला भिडले होते. तेव्हा चेन्नईने 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हा सामना गुजरातने 63 धावांनी गमावला होता. त्यामुळे नेट रनरेटवर फटका बसला होता. आता गुरुवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सचे 4, तर चेन्नईचे 7 खेळाडू बेस्ट ठरतील. गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल, डेविड मिलर, राशीद खान, साई सुदर्शन हे खेळाडू बाजी मारू शकतात. तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शार्दुल ठाकुर, दीपक चहर आणि मथीसा पाथिराना हे खेळाडू सामना फिरवू शकतात.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना समान फायदा देणारी आहे. या ठिकाणी खेळला गेलेला शेवटचा आयपीएल सामन्यात सर्वोत्तम धावसंख्या झाली होती. गुजरातने आरसीबीला 200 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान आरसीबीने 16 षटकात पूर्ण केलं होतं.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

गुजरात टायटन्स: मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

इम्पॅक्ट प्लेयर: अभिनव मनोहर

चेन्नई सुपर किंग्स: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.

इम्पॅक्ट प्लेयर: सिमरजीत सिंग

Non Stop LIVE Update
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....