IPL 2024 RCB vs KKR : केकेआरने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. स्पर्धेतील हा सामना असून आरसीबीचा तिसरा, तर केकेआरचा दुसरा सामना आहे. या सामन्यात कोलकाता आणि आरसीबी विजयाची लय कायम ठेवते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

IPL 2024 RCB vs KKR : केकेआरने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 7:08 PM

आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील एक महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्याकडे इतर बऱ्याच अँगलने पाहिलं जातं आहे. दोन खेळाडूंमधील द्वंद्व आणि इतर बऱ्याच गोष्टी लागू आहेत. हे दोन्ही संघ आतापर्यंत 32 वेळा आमनेसामने आले आहेत. 14 सामन्यात बंगळुरुने तर 18 सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आहे. त्यामुळे कोलकात्याचं पारडं आकडेवारीत जड आहे. असं असलं तरी यंदाच्या आयपीएलमध्ये होमग्राउंड ट्रेंड आहे. त्यामुळे कोलकात्याला विजयासाठी धडपड करावी लागणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात हा सामना होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. क्युरेटरशी थोडक्यात गप्पा मारल्या, बॉलही फिरेल असं वाटत आहे. प्रत्येकजण उत्साही आहे. त्याच गतीने पुढे जायचे आहे. वर्तमानात असणे महत्त्वाचे आहे. माझी भूमिका अँकरची भूमिका आहे. भेदक गोलंदाजी लाइनअप असणे केव्हाही चांगले असते. अनुकूल रॉयला संघात घेतलं आहे.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला की, “आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. ही एक फ्रेश विकेट आहे, चांगली विकेट दिसते, पहिल्या डावात कशी खेळते ते पाहावे लागेल. हंगामाच्या सुरुवातीला चांगला खेळ करणे महत्त्वाचे आहे. परिस्थितीचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. आम्हाला समर्थन आणि वातावरण आवडते. तोच संघ घेऊन मैदानात उतरणार आहोत.”

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.