LSG vs KKR : लखनऊचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Toss : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सामना जिंकला आहे.

LSG vs KKR : लखनऊचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
shreyas iyer and kl rahul lsg vs kkr toss,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 05, 2024 | 7:46 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. केएल राहुल लखनऊचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे कोलकाता टीमची जबाबदारी आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनऊनच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. केएल राहुल याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय. तर लखनऊ सुपर जायंट्समध्ये एक बदल झाला आहे. लखनऊचा स्टार बॉलर मयंक यादव याला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं आहे. मयंकच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये यश ठाकुर याचा समावेश करण्यात आला आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. लखनऊ कोलकातावर वरचढ राहिली आहे. लखनऊने 4 पैकी 3 सामन्यात कोलकातावर विजय मिळवला आहे. तर कोलकाताला लखनऊ विरुद्ध फक्त एकदाच विजय मिळवण्यात यश आलंय. आता दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता लखनऊ होम ग्राउंडमध्ये बाजी मारणार की कोलकाता विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने पुढे जाणार? याकडे लक्ष असणार आहे.

लखनऊ विरुद्ध कोलकाता आधी बॅटिंग करणार

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान आणि यश ठाकूर.