दारुण पराभवानंतरही लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफ गाठणार! कसं आहे गणित समजून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धा या ना त्या कारणाने चर्चेत आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर काही ना काही घडत आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यानंतर असंच काहीसं पाहायला मिळालं. लखनौचे संघ मालक यांना पराभवानंतर राग अनावर झाला. पण असं असलं तरी लखनौचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. कसं ते समजून घ्या

दारुण पराभवानंतरही लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफ गाठणार! कसं आहे गणित समजून घ्या
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 4:45 PM

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. अजूनही कोणताच संघ अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हा सामना पार पडला. हा सामना हैदराबादने 10 गडी राखून 9.4 षटकातच आपल्या खिशात घातला. दारुण झालेल्या पराभवानंतर संघ मालक संजीव गोयंका चांगलेच संतापलेले दिसले. तसेच भर मैदानातच त्यांनी केएल राहुलला धारेवर धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने या व्हिडीओचं विश्लेषण करत आहेत.अशा सर्व चर्चांना उधाण आलं असताना लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. लखनौ सुपर जायंट्सला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे, कशी ते समजून घेऊयात…

लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 6 सामन्यात विजय मिळवून 12 गुण मिळवले आहेत. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिकेत चेन्नई, दिल्ली आणि लखनौचे प्रत्येकी 12 गुण आहेत. पण नेट रनरेट कमी असल्याने लखनौचा संघ सहाव्या स्थानावर आहे. आता लखनौ सुपर जायंट्सला अजून दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. उर्वरित दोन सामने हे दिल्ली आणि मुंबईसोबत आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तर 16 गुण होतील. दिल्लीला पराभूत केलं तर वाटेतील एक काटा कमी होईल.पण चेन्नईला टॉप 4 मधून बाहेर काढायचं असेल तर मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामनाही जिंकावा लागेल.तसेच चेन्नईनेही उर्वरित तीन सामन्यापैकी दोन सामने गमावणं गरजेचं आहे.

इतकंच काय तर गुणतालिकेत टॉपला असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा प्लेऑफचा मार्ग आणखी सुकर होईल. नाहीतर टॉपला या तिन्ही संघांनी इथून पुढे सर्व सामने गमवणं आवश्यक आहे. त्यामुळे यापैकी कोणतंही समीकरण जुळून आलं तर लखनौला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण उर्वरित दोन सामन्यात लखनौला आपला नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. कारण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटवर जबरदस्त परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Non Stop LIVE Update
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.