फक्त धोनी विषय संपला : IPL बंद झाली तरी धोनीचा हा रेकॉर्ड मोडला नाही जाणार

सीएसके संघाचा माजी कर्णधार धोनीचा एक विक्रम असा आहे जो आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच मोडला जाणार नाही. कारण या रेकॉर्डच्या आसपासही कोणीच नाही. नेमका कोणता आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या.

फक्त धोनी विषय संपला : IPL बंद झाली तरी धोनीचा हा रेकॉर्ड मोडला नाही जाणार
MS Dhoni
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 7:04 PM

मुंबई : आयपीएल 2024 ला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा अवधी बाकी आहे. यंदाच्या मोसमात पाच ते सहा संघांनी आपले कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये दोन मोठी नावे आहे. महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा दोन्ही दिग्गज खेळाडू आता कॅप्टन म्हणून नाहीतर खेळाडू म्हणून मैदानात दिसणार आहेत. दोघांनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले असून धोनीचा एक विक्रम असा आहे जो आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच मोडला जाणार नाही. कारण या रेकॉर्डच्या आसपासही कोणीच नाही. नेमका कोणता आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या.

धोनीचा कधीही न मोडला जाणारा महारेकॉर्ड

आयपीएलमध्ये विकेटकीपर आणि कॅप्टन म्हणून सर्वाधिक सामने खेळलेल्या यादीमध्ये धोनी नंबर वन आहे. टॉप पाचमध्ये या यादीमध्ये भारतीय खेळाडूंसह एका परदेशी खेळाडूचाही समावेश आहे. मात्र धोनी आणि इतर खेळाडूंमध्ये खूप अंतर आहे. धोनीने किती सामने खेळले आहेत जाणून घ्या.

या यादीमध्ये महेंद्र सिंग धोनी 220 सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर  अॅडम गिलख्रिस्टने 74 सामने, संज सॅमसन 45 सामने, दिनेश कार्तिक 43 सामने, रिषभ पंत 30 सामने, कुमार संगकारा 27 सामने, के.एल. राहुल 23 सामने खेळले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या 220 सामन्यांचा विक्रम कोणीच मोडणार नाही. कारण कॅप्टन आणि विकेटकीपरम्हणून फार कमी खेळाडूंना संधी मिळेल.

दरम्यान,  आता धोनी कॅप्टन म्हणून मैदानात दिसणार नाही. माहीनेच ऋतुराजकडे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतल्याचं सीएसकेच्या सीईओंनी सांगितलं. महाराष्ट्राचा वाघ असलेला ऋतुराज आता आपल्या नेतृत्त्वात संघाला यश मिळवून देतो  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.