AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारी हिचे 2 घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, ऑनसक्रिन जावयासोबत अफेअरच्या चर्चा आणि बरंच काही…

Shweta Tiwari | दोन घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध... श्वेता तिवारी हिच्या खासगी आयुष्याच्या सर्वत्र चर्चा, ट्रोलर्स म्हणाले, 'मुलाच्या वयाच्या मुलासोबत...', श्वेता तिवारी कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

श्वेता तिवारी हिचे 2 घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, ऑनसक्रिन जावयासोबत अफेअरच्या चर्चा आणि बरंच काही...
| Updated on: May 08, 2024 | 1:37 PM
Share

अभिनेता श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘कसोटी जिंदगी की’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. श्वेताने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात अभिननेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. दरम्यान श्वेता हिचा अभिनेत्यासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

श्वेता तिवरी हिचा अभिनेता वरुन कस्तुरिया याच्यासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे श्वेताच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. वरुन कस्तुरिया याने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘आई आणि मुलगा’ असं लिहिलं आहे. पण तरी देखील अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. ‘मुलाच्या वयाच्या मुलाला डेट करत आहे?’ असे कमेंट करत अनेक जण अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘इमली’ फेम अभिनेता फहमान खान याच्यासोबत देखली श्वेता हिच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. जो श्वेता हिच्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे. फहमान खानने मुलाखतीत सांगितलं, ‘मेरे डॅड की दुल्हन’ दरम्यान श्वेता तिवारीसोबत त्याच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं.

एवढंच नाही तर, श्वेता तिवारी हिचं नाव ‘खतरो के खिलाडी’ स्पर्धक विशाल आदित्य याच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं. रंगणाऱ्या चर्चांवर विशाल म्हणाला होता, मी कायम श्वेता हिच्यासोबत फ्लर्ट करायचो… सांगायचं झालं तर, ‘बेगुसराय’ मालिकेत श्वेता हिने विशाल याच्या आईची भूमिका साकारली होती.

श्वेता तिवारी हिचं नाव ‘कसोटी जिंदरी की’ फेम सिझान खान याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. सिझान याने देखील रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याची संगितलं होतं. श्वेता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

श्वेता तिवारी हिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने राजा चौधरी याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे. मुलीचं नाव पलक तिवारी असं आहे. श्वेता आणि राज यांचं लग्न फक्त 9 वर्ष टिकलं. श्वेताने राजा चौधरी याच्यावर मारहाणीचे आरोप लावले होते.

अभिनेत्री दुसरं लग्न वयाच्या 43 व्या वर्षी केलं. श्वेताच्या दुसऱ्या पतीचं नाव अभिनव कोहली असं आहे. 13 जुलै 2013 मध्ये अभिनेत्री लग्न केलं. अभिनेत्रीचं दुसरं लग्न फक्त 6 वर्ष टिकलं. दोघांना एक मुलगा आहे. ज्याचं नाव रेयांश असं आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत