AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमोग्लोबिन कमतरता का होते ?, बिट आणि हिरव्या पालेभाज्या किती महत्वाच्या ?

हिमोग्लोबिन कमी होण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. यात आयर्नची कमी देखील एक मोठे कारण आहे. शरीरात आयर्न कमी असल्याने थकवा,चक्कर येणे, दम लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. यामुळे योग्य निदान आणि उपचार करणे गरजेचे असते.

हिमोग्लोबिन कमतरता का होते ?, बिट आणि हिरव्या पालेभाज्या किती महत्वाच्या ?
Iron Deficiency In Women
| Updated on: Nov 10, 2026 | 7:32 PM
Share

तुम्ही तुमची CBC टेस्ट केली असेल त्यात हिमोग्लोबिन कमी आढळले तर ही एक चिंतेची बाब आहे. मात्र, हे जाणणे देखील महत्वाचे आहे की शरीरात हिमोग्लोबिनचे लेव्हल कमी का होते ? आणि हिरव्या भाज्या, बिट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का ? याला समजण्यासाठी तुम्हाला शरीरातील उपलब्ध असलेल्या आयर्न संदर्भात जाणणे गरजेचे आहे.आयर्न आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. हिमोग्लोबिनचे काम शरीरातील प्रत्येक भागात ऑक्सीजन पोहचवणे असते. जेव्हा शरीरात आयर्नची कमतरता होते, तेव्हा थकवा, चक्कर येणे, दम लागणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे आणि केस गळणे असा समस्या निर्माण होऊ शकतात.

काही लोकांमध्ये बर्फ वा चॉक सारख्या वस्तू खाण्याचे मन होते. तसेच काही लोकांना रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या होऊ शकते. ज्यात खासकरुन रात्रीच्या वेळी पाय सतत हलवण्याचे मन करते. आणि पायात विचित्र बेचैनी जाणवते. हे सर्व आयर्नच्या कमतरतेने होते. जर आयर्न कमी असेल तर हिमोग्लोबिन देखील कमी होते. कारण शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्न सर्वात गरजेचे असते. जेव्हा शरीरात आयर्नची कमी होते तेव्हा बोन मॅरो पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही. यामुळे हिमोग्लोबिनची लेव्हल देखील कमी होते.

आयर्नची कमतरता का होते ?

तुमच्या जेवणात पालेभाज्या, डाळी, नट्स, आयर्न नसेल तर शरीरात याची कमतरता होऊ शकते. छोट्या मुलांमध्येही आयर्नची कमतरता होऊ शकते. महिलांमध्ये पीरियड्स दरम्यान खूप जास्त ब्लीडिंग झाल्याने हार्मोनमध्ये बदल होऊ शकतात. काही प्रकरणात याचे कारण एखादे ब्लीडिंग डिसऑर्डर देखील असू शकते. यामुळेही आयर्नची कमतरता होऊ शकते.

जर एखाद्या महिलेत जास्त ब्लीडिंग होत असेल तर वारंवार आयर्नची गोळ्या खाल्ल्याने समस्येचे समाधान होऊ शकत नाही. जोपर्यंत जास्त ब्लीडिंगचे कारणाचा उपचार केला जात नाही. तोपर्यंत शरीरात आयर्नची कमतरता पुन्हा होऊ शकते. यामुळे शरीरात एनिमियाचा आजार होऊ शकतो. मात्र, प्रत्येक एनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता, आयर्नच्या कमतरतेने होत नाही. थॅलेसिमिया, व्हिटामिनची कमतरता आणि किडनीशी संबंधित आजारही हिमोग्लोबिनची कमी झाल्याने होऊ शकतात.

जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीला आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनिमियाचे निदान झाले असेल आणि त्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिसत नसेल, तर शरीरातील कोणत्याही भागात रक्तस्राव तर होत नाही याची तपासणी करणे महत्त्वाचे असते. पोटातील किंवा आतड्यांचा अल्सर, आतड्यांचे आजार आणि काही प्रकरणांमध्ये, कर्करोगामुळे देखील हळूहळू ॲनिमिया होऊ शकतो. मूळव्याधीने देखील रक्तस्राव होऊ शकतो, परंतु योग्य निदानाशिवाय ॲनिमियाचे कारण गृहीत धरणे योग्य नसते. तसेच इबुप्रोफेन आणि डायक्लोफेनाकसारख्या वेदना आणि सूज कमी करणाऱ्या औषधांच्या वारंवार वापरामुळे पोट आणि आतड्यांच्या अस्तराला इजा होऊ शकते. यामुळे हळूहळू शरीरात रक्तस्राव होऊ शकतो, ज्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का?

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच आपल्या आहारात कडधान्ये, शेंगा, हिरव्या पालेभाज्या, लोहयुक्त पदार्थ, मांस आणि मासे यांचा समावेश करावा. बीट, खजूर आणि गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते, परंतु जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच ॲनिमिया असेल, तर केवळ या पदार्थांच्या आधारे त्यावर उपचार करता येत नाहीत. अनेक रुग्णांना आयर्न सप्लिमेंट्सची आवश्यकता असते, तर काही प्रकरणांमध्ये शिरेवाटे आयर्न (इंट्राव्हेनस आयर्न) देणे आवश्यक असू शकते. हिमोग्लोबिनची पातळी सुधारत आहे की नाही हे तपासण्यासाठी उपचारानंतर पुन्हा रक्त तपासणी करणे देखील महत्त्वाचे असते.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?