हेमा मालिनी यांच्यामुळे नातेवाईकांवर आली वाईट वेळ? भाचीकडून खंत व्यक्त

Hema Malini | हेमा मालिनी यांच्यामुळे नातेवाईकांना करावा लागतोय अनेक संकटांचा सामना? 'ड्रीम गर्ल'च्या चुलत बहिणीचे धक्कादायक वक्तव्य... हेमा मालिनी आज त्यांच्या कुटुंबासोबत जगत आहेत आनंदी आणि रॉयल आयुष्य... सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी याच्या बहिणीच्या वक्तव्याची चर्चा...

हेमा मालिनी यांच्यामुळे नातेवाईकांवर आली वाईट वेळ? भाचीकडून खंत व्यक्त
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 11:10 AM

अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सध्या हेमा मालिनी अभिनयापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता हेमा मालिनी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. सांगायचं झालं तर, हेमा मालिनी प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्यामुळे त्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता हेमा मालिनी यांच्या भाचीने मोठं वक्तव्य केलं आहे.

1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ सिनेमात अभिनेत्री मधू शाह हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या अनेक वर्षांपासून मधू अभिनयापासून दूर आहे. पण आता अभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून नुकताच झालेल्या मुलाखतीत मधू हिने हेमा मालिनी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मधू म्हणाली, ‘मी हेमा मालिनी यांची चुलत बहीण आहे. जुही चावला माझ्या पतीच्या भावाच्या पत्नी आहे. आमचं संपूर्ण कुटुंब अभिनय विश्वातील आहे. पण माझ्या लग्नानंतर जुही माझ्या आयुष्यात आल्या आणि लग्नानंतर मी इंडस्ट्रीचा निरोप घेतला होता. त्यामुळे इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयामुळे मला कोणता फरक पडत नव्हता…’

हे सुद्धा वाचा

हेमा मालिनी यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘हेमा मालिनी यांची नातेवाईक असल्यामुळे मात्र फरक पडला… त्यांच्यामुळे मला इंडस्ट्रीमध्ये आदर आणि सन्मान मिळाला. माझे वडील देखील निर्माता होते. त्यामुळे बाहेरून आलेल्या मुलींना जो संघर्ष करावा लागतो, तसा संधर्ष मला करावा लागला नाही…’

‘मला हेमा मालिनी यांच्यामुळे सिनेमे मिळाले नाहीत… हीट्स मिळाले नाही. पण सन्मान मिळाला. जर मी कोणत्या निर्मात्याच्या ऑफिसमध्ये जाते तर मला सन्मान मिळतो… हेमा मालिनी यांच्या कुटुंबातील असल्यामुळे मला हा सन्मान मिळतो…’ असं देखील अभिनेत्री मधू म्हणाली.

मधू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फूल और कांटे, रोजा, अल्लारी प्रियडू, योधा आणि जेंटलमन यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मधू हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.