IPL 2024 PBKS vs CSK Live Streaming : पंजाब विरुद्ध चेन्नई सलग दुसऱ्यांदा आमनेसामने, दोघांसाठी विजय महत्त्वाचा, कोण जिंकणार?

Punjab Kings vs Chennai Super Kings Live Streaming : पंजाब आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

IPL 2024 PBKS vs CSK Live Streaming : पंजाब विरुद्ध चेन्नई सलग दुसऱ्यांदा आमनेसामने, दोघांसाठी विजय महत्त्वाचा, कोण जिंकणार?
ruturaj gaikwad and sam curran csk vs pbks,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 4:38 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन याच्या अनुपस्थितीत सॅम करन याच्याकडे संघाची सूत्रं आहेत. या हंगामात दोन्ही संघं सलग दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. त्याआधी पंजाबने 1 मे रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं होतं. त्यामुळे आता चेन्नई आणि पंजाब दोन्ही संघांचा हा सामना जिंकून शर्यतीत कायम राहण्याचं प्रयत्न असणार आहे. चेन्नई विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर पंजाब दुसऱ्यांदा चितपट करण्यासाठी तयार आहे. चेन्नई आणि पंजाब दोन्ही संघांचा हा 11 वा सामना आहे. चेन्नईने 10 पैकी 5 तर पंजाबने 10 मधून 4 सामने जिंकले आहेत. चेन्नई पाचव्या आणि पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे.

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना रविवारी 5 मे रोजी होणार आहे.

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना हा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

पंजाब विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स टीम : सॅम कुरन (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत सिंग भाटिया, ऋषी धवन, विद्वथ कवेरप्पा, शिखर धवन, ख्रिस वोक्स, सिकंदर रझा, तनय त्यागराजन, अथर्व तायडे, नाथन एलिस, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी आणि विश्वनाथ सिंग.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजूर रहमान, समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शारद सिंह , प्रशांत सोळंकी , मिचेल सँटनर , रचिन रवींद्र , तुषार देशपांडे , अजय जादव मंडल , राजवर्धन हंगरगेकर , मथीशा पथीराणा , महेश तीक्षना , निशांत सिंधू आणि अरावेली अवनीश.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.