AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FACT CHECK: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर नीता अंबानी-रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल, एमआयच्या मालक काय म्हणतात…

Rohit Sharama and neeta Ambani Video: रोहित शर्मा याने या सामन्यात 38 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून त्याचे कौतूक केले. चाहत्यांच्या मते, वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून हा शेवटचा सामना खेळत आहे.

FACT CHECK: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर नीता अंबानी-रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल, एमआयच्या मालक काय म्हणतात...
Rohit Sharama and Neeta Ambani
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 19, 2024 | 7:11 AM
Share

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई संघाचा 18 धावांनी पराभव केला. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानी राहिली. मुंबई इंडियन्सचा शेवट गोड झाला नाही. या सामन्यात मुंबईला 215 धावांचे आव्हान असताना 20 ओव्हरमध्ये 196 धावांपर्यंतच पोहचता आले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा हा 10 वा पराभव झाला. मुंबईचा संघ या हंगामातील सर्वात शेवटी 10 व्या स्थानी राहिला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा मालक नीता अंबानी आणि रोहित शर्मा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ नीता अंबानी रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्सच्या संघात राहण्याचा सांगत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. काय आहे तो व्हिडिओ…

प्रेक्षकांनी केले रोहितचे कौतूक

रोहित शर्मा याने या सामन्यात 38 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून त्याचे कौतूक केले. चाहत्यांच्या मते, वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून हा शेवटचा सामना खेळत आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे एमआयच्या मालक नीता अंबानी यांनी सामन्यानंतर रोहितसोबत केलेले दीर्घ चर्चा केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या चर्चेत अनेकांना असा विश्वास आहे की नीता अंबानी रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्ये राहण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. परंतु त्याची पुष्टी करण्यासाठी ऑडिओ त्या व्हिडिओत नाही. त्यामुळे दोघांचा संवाद ऐकता येत नाही.

असा ही एक व्हिडिओ

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानातून बाहेर जात आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याची मैदानात एन्ट्री होत आहे. पंकज मिस्त्रा नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा, रोहित बाहेर जात आहे आणि हार्दिक आत येत आहे, असे म्हटले आहे. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा