RCB vs GT : फाफचं अर्धशतक, विराटचा तडाखा, आरसीबीचा 4 विकेट्सने विजय, गुजरातचं टेन्शन वाढलं

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Match Result : आरसीबीचा हा सलग तिसरा विजय ठरला. आरसीबीने गुजरातवर 4 विकेट्सने विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

RCB vs GT : फाफचं अर्धशतक, विराटचा तडाखा, आरसीबीचा 4 विकेट्सने विजय, गुजरातचं टेन्शन वाढलं
faf du plessis and virat kohli,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 11:05 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळरुने आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 13.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 152 धावा केल्या. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमधील जरतरचं आव्हान कायम राखण्यात यश मिळवलंय. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचं पराभवामुळे प्लेऑफच्या हिशोबाने टेन्शन वाढलंय.

आरसीबीची जोरदार सुरुवात मग घसरगुंडी

फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या आजी माजी कर्णधारांनी आरसीबीला जोरदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी तडाखेदार आणि विस्फोटक बॅटिंग केली. फाफने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी 92 धावांची भागीदारी केली. फाफ 23 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्ससह 64 धावांची खेळी केली. फाफनंतर आरसीबीची घसरगुंडी झाली.

आरसीबीने अवघ्या 25 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. विल जॅक्स 1, रजत पाटीदार 2, ग्लेन मॅक्सवेल 4 आणि कॅमरुन ग्रीन 1 आणि विराट कोहली 42 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंह या जोडीने आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. दिनेश कार्तिकने 12 बॉलमध्ये नाबाद 21 धावा केल्या. तर स्वप्नील सिंह याने 15 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून एकट्या जोशुआ लिटीलने 4 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीची प्लेऑफची आशा कायम

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या गोलंदाजांनी कॅप्टन फाफ डु प्लेसीसचा निर्णय योग्य ठरवला. आरसीबीने गुजरातला 19.3 ओव्हरमध्ये 147 धावांवर ऑलआऊट केलं. गुजरातकडून शाहरुख खान याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शाहरुखने 24 बॉलमध्ये 37 धावा केल्या. राहुल तेवतियाने 35 धावा जोडल्या. तर डेव्हिड मिलरने 30 धावा केल्या. राशिद खान याने 18 आणि विजय शंकरने 10 धावांची भर घातली. या व्यतिरिक्त कुणालाही खा करता आलं नाही. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख या तिघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर कॅमरुन ग्रीन आणि कर्ण शर्माच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.

गुजरात टायटन्स लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

Non Stop LIVE Update
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.