AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला काहीही करून नाणेफेक जिंकणं गरजेचं! का ते जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील निकाल प्लेऑफचा चौथा संघ ठरवणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. खासकरून आरसीबीचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले आहेत. 16 वर्षांचा दुष्काळ दूर करण्याची संधी मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र असं असताना नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

IPL 2024, RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला काहीही करून नाणेफेक जिंकणं गरजेचं! का ते जाणून घ्या
| Updated on: May 18, 2024 | 2:22 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला 18 धावा किंवा 11 चेंडू राखून पराभूत केलं तरच प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने बरंच काही ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला तर एक गणित जुळून येईल. कारण पाऊस आला तर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार घेतला जाईस. त्यामुळे आरसीबीचं गणित बदलू शकतं. आरसीबीला विजयाससह निव्वल धावगती राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणं हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पथ्यावर पडेल. कारण सामन्यादरम्यान पाऊस पडला तर षटकं कमी होतील. त्यामुळे आरसीबीचं गणित कोलमडू शकतं. दुसरीकडे, पाऊस पडला नाही तर गोलंदाजी निवडणं फायद्याचं ठरेल.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. पावसाची शक्यता असल्यास आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावी. त्यामुळे पहिल्या डावात 20 षटकं खेळण्याची संधी मिळेल. तसेच मोठी धावसंख्या उभारणं शक्य होईल. पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमानुसर चेन्नई सुपर किंग्सला मोठं आव्हान मिळेल. त्यामुळे आरसीबीला 18 धावांनी विजय मिळवून प्लेऑफ गाठणं शक्य होईल. पण आरसीबी पाठलाग करत असेल तर हे गणित बदलेल आणि कठीण होईल. कारण 11 चेंडू राखून विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही.

चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 201 धावा केल्या तर हे आव्हान 18.1 षटकात पूर्ण करावं लागेल. पण पाऊस आला तर षटकं कमी होती आणि धावांचं लक्ष्य वाढेल. त्यामुळे मोठा फरक पडल्याने नेट रनरेटचं गणित सोडवणं कठीण जाईल. त्यामुळे षटकं कितीही कमी झाली तरी दिलेली धावसंख्या आरसीबीला 11 चेंडू राखूनच पूर्ण करावं लागेल. त्यामुळे आरसीबीला पावसाचं गणित लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी करणं सोयीस्कर ठरू शकतं. अन्यथा आरसीबीला विकेट वाचवून पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करावी लागेल.

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपैकी एका संघाची निवड प्लेऑफसाठी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये राहण्याची संधी आहे. पण यासाठी राजस्थान आणि हैदराबादला साखळी फेरीतील उर्वरित सामन्यात पराभूत व्हावं लागेल.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.