IND vs PAK : 1.10 कोटीचा खेळाडू 1 धावेवर बाद, वैभव सूर्यवंशी पाकिस्तान विरुद्ध फ्लॉप

Vaibhav Suryavanshi IND vs PAK : 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने आयपीएल मेगा ऑक्शन 2024 मधून 1 कोटी 10 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्यानंतरच्या पहिल्याच सामन्यात वैभव अपयशी ठरला.

IND vs PAK : 1.10 कोटीचा खेळाडू 1 धावेवर बाद, वैभव सूर्यवंशी पाकिस्तान विरुद्ध फ्लॉप
Vaibhav Suryavanshi dismissed on 1 run against pakistan
| Updated on: Nov 30, 2024 | 4:02 PM

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये सर्वांचं लक्ष वेधणारा युवा वैभव सूर्यवंशी याची अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली आहे. वैभव सूर्यवंशी याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वैभव सूर्यवंशी 9 चेंडूत 1 धाव करुन माघारी परतला. अली रझा याने वैभव सूर्यवंशी याला साद बैग याच्या हाती कॅच आऊट केलं. वैभव सूर्यवंशी याच्याकडून 282 धावांचं आव्हान असल्याने चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र वैभव त्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.

वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षीय आयपीएल मेगा ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. तसेच वैभवने आयपीएलमधील सर्वात युवा कोट्यधीश खेळाडू होण्याचा बहुमानही मिळवला. वैभवची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती. मात वैभवसाठी अनेक संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र राजस्थान रॉयल्सने अखेरपर्यंत बोली लावली आणि वैभव सूर्यवंशीला आपल्या ताफ्यात घेण्यात यश मिळवलं. राजस्थानने वैभवसाठी 1 कोटी 10 लाख रुपये मोजले.

भारताला 282 धावांचं आव्हान

दरम्यान पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा केल्या. पाकिस्तानसाठी शाहझेब खान याने सर्वाधिक धावांच योगदान दिलं. शाहझेबने 147 चेंडूत 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 159 धावा केल्या. तर उस्मान खान याने 60 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज ढेपाळले. पाकिस्तानने यासह 300 पार पोहचण्याची सुवर्णसंधी गमावली.

वैभव सूर्यवंशी 1 धावेवर बाद

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.