IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये 18 व्या मोसमाआधी मोठा बदल, या खेळाडूची एन्ट्री

Mumbai Indians IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस आहेत. त्याआधी मुंबईचा एक खेळाडू या हंगामातून बाहेर झाला आहे. जाणून घ्या.

IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये 18 व्या मोसमाआधी मोठा बदल, या खेळाडूची एन्ट्री
mumbai indians fans
Image Credit source: Mipaltan X Account
| Updated on: Mar 13, 2025 | 6:31 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा (Ipl 2025) श्रीगणेशा शनिवार 22 मार्चपासून होत आहे. या हंगामात एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी 2 महिने चुरस पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सांगता झाल्यानंतर अनेक खेळाडू हे आयपीएलमधील आपल्या संघात जोडले जात आहेत. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाड विलियम्स हा मुंबईच्या गोटात होता. मात्र लिझाडला दुखापतीमुळे या 18 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. लिझाड गेल्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्समध्ये होता. मात्र मुंबईने त्याला मेगा ऑक्शनमधून आपल्याकडे घेतलं. मात्र त्याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. मुंबई इंडियन्सकडून 8 मार्चला याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच लिझार्डच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलं.

कुणाला संधी?

लिझार्डच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्याच खेळाडूला मुंबई संघात संधी देण्यात आली आहे. लिझार्डच्या जागी कॉर्बिन बॉश याचा समावेश करण्यात आला आहे. बॉशने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 कसोटी 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच कॉब्रिनने 86 टी 20 सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत. कॉर्बिन याआधी 2022 साली राजस्थान रॉयल्स टीममध्ये होता. कॉर्बिनने तेव्हा नेट बॉलरची भूमिका बजावली होती.

मुंबईचा पहिला सामना केव्हा?

दरम्यान मुंबई या 18 व्या हंगामातील पहिला सामना हा 23 मार्च रोजी खेळणार आहे. मुंबईसमोर मोहिमेतील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे.

कार्बिन बॉश याची एन्ट्री

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.