IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्स संघासमोर अक्षरश: नांगी टाकली. चेन्नई सुपर किंग्सचे आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाले. शिवम दुबेही काही खास करू शकला नाही.

IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video
IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video
Image Credit source: video grab
| Updated on: Mar 30, 2026 | 9:28 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम निराशाजनक झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी वाटेला आली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांसमोर होतं. पण सामना सुरू झाला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी तंबूत परतण्यासाठी रांग लावली. एकही फलंदाज धड खेळू शकला नाही. जेमी ओव्हरटनने वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. सरफराज खानच्या रुपाने सहावी विकेट पडली आणि शिवम दुबे सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 7.2 षटकात चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट गमावल्या होत्या. शिवम दुबे ड्रेसिंग रूममधून सेट होऊन आला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आक्रमक खेळणार असं दाखवून दिलं. पण झालं असं की…

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचा सामना करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर शिवम दुबेकडून फार अपेक्षा होत्या. 8व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने सरफराज खानची विकेट काढली. त्यानंतर फलंदाजीला शिवम दुबे आला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपला हेतू स्पष्ट केला. त्यानंतर रवींद्र जडेजाने दोन चेंडू निर्धाव टाकले. शिवम दुबेने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने उत्तुंग फटका मारला. पण चेंडू काही सीमापार गेला नाही. तसेच सीमेजवळ उभ्या असलेल्या रवि बिष्णोईने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे शिवम दुबेचा डाव अवघ्या 6 धावांवर आटोपला. या विकेटनंतर रवींद्र जडेजाने वेगळ्या शैलीत सेलीब्रेशन केलं. त्याने दोन बोटांची बंदूक करत हवेत गोळीबार केल्याचं अविर्भाव केला.

संजू सॅमसन 6, ऋतुराज गायकवाड 6, आयुष म्हात्रे 0, मॅथ्यू शॉट 2, सरफराज खान 17, कार्तिक शर्मा 18, शिवम दुबे 6, नूर अहमद 1 आणि मॅट हेन्री 5 धावा करून बाद झाले. जेमी ओव्हरटन 43 धावांवर असताना धावचीत झाला. चेन्नई सुपर किंग्सने 19.4 षटकात सर्व गडी गमवून 127 धावा केल्या. तसेच राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

Follow Us