AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RR : संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससमोर फेल, 2020 नंतर पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. संजू सॅमसनच्या फलंदाजीकडे यावेळी लक्ष होतं, पण...

CSK vs RR : संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससमोर फेल, 2020 नंतर पहिल्यांदाच असं घडलं
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससमोर फेल, एक चौकार मारला आणि...Image Credit source: CSK TWITTER
| Updated on: Mar 30, 2026 | 8:05 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संजू सॅमसनने धुमाकूळ घातला होता. त्याच्या अप्रतिम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं सोपं झालं. त्याच फॉर्मसह संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात उतरला होता. स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळाडूंची अदलाबदल झाली होती. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून उतरणार असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं होतं. या स्पर्धेत नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे संजू सॅमसनची फलंदाजी पाहता येईल यासाठी चाहते उत्सुक होते. संजू सॅमसन सलामीला उतरणार हे निश्चित होतं. सोबतीला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड होता. त्यामुळे पहिल्या षटकापासून उत्सुकता ताणली गेली होती.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पहिलं षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर आला आणि समोर संजू सॅमसन होता. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर लेग बाय धाव आली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने तिसऱ्या चेंडूवर एक धावा काढून पुन्हा संजू सॅमसनला स्ट्राईक दिली. चौथा चेंडू संजूने निर्धाव घालवला. पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि सहाव्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली स्ट्राईक रोटेट झाली. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला आला. पण हा चेंडू शेवटचा ठरला. कारण या चेंडूवर नांद्रे बर्गरने क्लिन बोल्ड केलं. संजू सॅमसन फक्त 6 धावा करून तंबूत परतला.

संजू सॅमसनबाबत असं काही घडलं

संजू सॅमसन आयपीएल स्पर्धेत 2020 नंतर पहिल्यांदाच एकेरी धावसंख्येवर बाद झाला. यापूर्वी 2020 ते 2025 या कालावधीत त्याने प्रत्येक हंगामाच्या पहिल्या सामन्यात 50हून अधिक धावा केल्या आहेत. 2020 मध्ये सीएसकेविरुद्ध 74, 2021 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 119, 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 55, 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 55, 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 82, 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 66 धावा केल्या. पण यावेळी पहिल्या सामन्यात फक्त 6 धावा करून बाद झाला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...