CSK vs SRH Toss : चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, हैदराबादला हवं ते मिळालं, पाहा प्लेइंग ईलेव्हन

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. चेन्नईने या सामन्यात पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

CSK vs SRH Toss : चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, हैदराबादला हवं ते मिळालं, पाहा प्लेइंग ईलेव्हन
CSK vs SRH Toss IPL 2026
Image Credit source: Social Media
| Updated on: May 18, 2026 | 7:55 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 63 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 13 वा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. एमए चिदंबरम स्टेडियममधील 19 व्या मोसमातील शेवटचा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या मनासारखं झालं. ऋतुराजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर आम्हाला फिल्डिंगच करायची होती, असं पॅट कमिन्स याने टॉस गमावल्यानंतर स्पष्ट केलं. त्यामुळे यलो आर्मी आपल्या घरच्या मैदानातील शेवटच्या सामन्यात किती धावांपर्यंत मजल मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

सीएसके विरुद्ध एसआरएच यांच्या या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. सीएसकेने या 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने 8 वेळा विजय मिळवला आहे. तसेच चेन्नईत खेळवण्यात आलेल्या 6 पैकी 5 सामन्यांत सीएसकेने विजय मिळवला आहे. तर हैदराबादने एकदा सीएसकेला पराभूत केलं आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

सनरायझर्स हैदराबादने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चेन्नईने एकमेव बदल केला आहे. गुरजनप्रीत सिंह याच्या जागी अकील हुसैन याचा समावेश करण्यात आला आहे.

महेंद्रसिंह धोनी नाहीच

दरम्यान चेन्नईचा घरच्या मैदानातील शेवटचा सामना असल्याने महेंद्रसिंह धोनी खेळेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र धोनी प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. “धोनी इथेच आहे. मात्र तो खेळण्याइतपत फिट नाही”, असं टॉसनंतर ऋतुराजने सांगितलं.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि स्पेन्सर जॉन्सन.

Follow Us