AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs SRH: संजू सॅमसनकडून अशी अपेक्षा नव्हती! आपल्याच संघाचं नुकसान करून गेला?

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. असं असताना या सामन्यात संजू सॅमसनने आक्रमक सुरूवात केली. पण संघाचं नुकसान करून गेला.

IPL 2026, CSK vs SRH: संजू सॅमसनकडून अशी अपेक्षा नव्हती! आपल्याच संघाचं नुकसान करून गेला?
IPL 2026, CSK vs SRH: संजू सॅमसनकडून अशी अपेक्षा नव्हती! आपल्याच संघाचं नुकसान करू गेला?Image Credit source: PTI
| Updated on: May 18, 2026 | 8:52 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर विजय काहीही करून हवाच. असं असताना नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने लागला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक होता. चेन्नईकडून सलामीला संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात आली. संजू सॅमसनने आक्रमक सुरूवात केली. नितीश रेड्डीच्या गोलंदाजीचा सामना करताना पहिल्या षटकात संजू सॅमसनने स्ट्राईक घेतली. पहिला चेंडू नो बॉल टाकल्याने संजू सॅमसनला आयती संधी मिळाली आणि पुन्हा टाकलेल्या चेंडूवर षटकार मारत डावाची सुरूवात केली. त्यानंतर चौकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळताच चौकाराने हे षटक संपवलं.

सनरायझर्स हैदराबादकडून दुसरं षटक टाकण्यासाठी प्रफुल हिंगे आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले आणि चौथ्या-पाचव्या-सहाव्या चेंडूवर चौकार मारत हेतू स्पष्ट केला. संजू सॅमसनचा आक्रमक पवित्रा पाहून कर्णधार पॅट कमिन्सने तिसरं षटक हाती घेतलं. या षटकात दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनला स्ट्राईक मिळाली. त्याने हा चेंडू निर्धाव घालवला. पण पुढच्या चेंडूवर कट लागून चेंडू विकेटकीपर इशान किशनच्या हाती गेला. पंचांनीही त्याला बाद दिले. पण संजू सॅमसनने रिव्ह्यू घेतला. खरं तर स्पष्टपणे कट लागली होती आणि रिव्ह्यू घेण्याची गरज नव्हती. तरी त्याने तसं केलं. अखेर तिसऱ्या पंचांनी शहनिशा केली आणि बाद असल्याचं जाहीर केलं. यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा एक रिव्ह्यू वाया गेला. खरं तर हा रिव्ह्यू फुकटचा गेला.

संजू सॅमसनचा खेळ 27 धावांवर आटोपला पण त्याने महेंद्रसिंह धोनीचा एक विक्रम मोडीत काढला. 13 वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीच्या नावावर हा विक्रम होता. त्याने विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. महेंद्रसिंह धोनीने 2013 च्या हंगामात 16 डावांमध्ये 461 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी सॅमसनला फक्त 12 धावांची गरज होती. संजू सॅमसनने 13 चेंडूत 27 धावा केल्या आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. संजू सॅमसनच्या नावावर 13 डावात 477 धावा आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...