AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs GT : येडा रे येडा, मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने जिंकलेला सामना गमावला, गुजरातचा 1 रनने सनसनाटी विजय

Delhi Capitals vs Gujarat Titans IPL 2026 Match Result : डेव्हीड मिलर स्ट्राईकवर असल्याने तो 1 चेंडूत 2 धावा करुन दिल्लीला जिंकवेल असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र प्रसिध कृष्णाने हुशारीने बॉल टाकला. त्यानंतर जोस बटलर याने हुशारीने कुलदीप यादव याला रन आऊट केलं. गुजरातने अशाप्रकारे हा सामना 1 धावेने आपल्या नावावर केला.

DC vs GT : येडा रे येडा, मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने जिंकलेला सामना गमावला, गुजरातचा 1 रनने सनसनाटी विजय
Rashid Khan and David Miller DC vs GT IPL 2026Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 09, 2026 | 2:39 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 14 व्या सामन्याचा विजेता संघ शेवटच्या चेंडूवर ठरला आहे. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 1 रनने सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरातने दिल्लीसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने या धावांचा अप्रतिम पाठलाग केला. त्यामुळे दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. मात्र प्रसिध कृष्णा याने हुशारीने बॉल टाकला. मिलरने या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातचा विकेटकीपर जोस बटलर याने स्ट्राईकवर हुशारीने कुलदीप यादव याला रन आऊट केलं. यासह गुजरातने 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. त्याआधी 20 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मिलरने 1 धाव घेण्यास नकार दिला. मिलरने ती 1 धाव घेतली असती तर किमान सामना बरोबरीत सुटला असता. मात्र मिलरचा एकेरी धाव न घेण्याचा निर्णय चुकीचा ठरला. परिणामी दिल्लीला 1 धावेने सामना गमवावा लागला.

सामन्यात काय झालं?

दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अक्षर पटेल याने गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 210 धावा केल्या. गुजरातसाठी तिघांनी सर्वाधिक आणि अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातला 210 धावांपर्यंत पोहचता आलं. गुजरातसाठी कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 70 रन्स केल्या. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने 55 धावांचं योगदान दिलं. तर जोस बटलर याने 52 रन्सची खेळी केली. दिल्लीसाठी मुकेश कुमार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

केएलची कडक बॅटिंग

दिल्लीसाठी केएल राहुल याने चाबूक बॅटिंग केली. केएलने 52 बॉलमथ्ये 92 रन्स केल्या. केएलने या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. तसेच पाथुम निसांका याने 24 चेंडूत 41 धावांचं योगदान दिलं. डेव्हीड मिलर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. मात्र मिलर गरज पडल्यावर मैदानात आला. मिलरने 20 चेंडूत 41 धावा केल्या. मिलरने दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरणार होता. मात्र दिल्लीने सामना 1 धावेने गमावला आणि मिलर पराभवाचा व्हिलन ठरला.

स्कोअरकार्ड

2 चेंडूत 2 धावांची गरज

मिलरने फटकेबाज करुन दिल्लीला विजयाजवळ आणून ठेवलं. दिल्लीला शेवटच्या 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. मिलर स्ट्राईकवर होता. तर कुलदीप यादव मिलरच्या साथीला होता. तर प्रसिध कृष्णा बॉलिंग करत होता. आता 2 चेंडूत 2 धावा हव्या असताना दिल्ली जिंकणार नाही, असं म्हणणं चुकीचं ठरणार होतं. मात्र मिलरने माती खाल्ली. मिलरने पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. मिलर प्रसिधने टाकलेला 20 ओव्हरमधील शेवटचा बॉल मारण्यात अपयशी ठरला. गुजरातने अशाप्रकारे विजयाचं खातं उघडलं.

Follow Us
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
प्रताप सरनाईकांसह ओमराजे निंबाळकर... 6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा...
प्रताप सरनाईकांसह ओमराजे... 6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत चक्क...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर