AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : केकेआरच्या अडचणीत वाढ, निर्णायक सामन्यात मॅचविनर फलंदाजाशिवाय खेळावं लागणार!

IPL 2026, Kolkata Knight Riders: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात जबरदस्त कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्वत:ला कायम ठेवलंय. केकेआर 24 मे रोजी दिल्ली विरुद्ध 2 हात करणार आहे. मात्र त्याआधी केकेआरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

IPL 2026 : केकेआरच्या अडचणीत वाढ, निर्णायक सामन्यात मॅचविनर फलंदाजाशिवाय खेळावं लागणार!
Kolkata Knight Riders Ajinkya RahaneImage Credit source: Bcci
| Updated on: May 21, 2026 | 9:40 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर केकेआरने सर्वाधिक 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र केकेआरला 19 व्या हंगामात चॅम्पियन्सप्रमाणे सुरुवात करण्यात अपयश आलं. केकेआरला पहिल्या विजयासाठी सातव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागली. त्याआधी केकेआरला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर केकेआरचा पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. मात्र त्यानंतर केकेआरने जोरदार कमबॅक केलं. केकेआरने गेल्या 7 पैकी 6 सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं. केकेआरने यासह स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं.

केकेआरला टेन्शन, काय झालं?

केकेआरने बुधवारी 20 मे रोजी मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने मात करत 2 गुणांची कमाई केली. केकेआरच्या या विजयामुळे प्लेऑफच्या आशा कायम आहेत. मात्र केकेआरच्या अडचणीत वाढ झाली आहे. केकेआरला साखळी फेरीतील आपल्या 14 व्या शेवटच्या सामन्याआधी मोठा झटका लागला आहे. केकेआरला प्लेऑफची संधी कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत आपल्या मोहिमेतील शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र केकेआरला या सामन्यात मॅचविनर फलंदाजाशिवाय उतरावं लागू शकतं.

नक्की काय झालंय?

केकेआरचा युवा विकेटकीपर फलंदाज अंगकृष रघुवंशी याला मुंबई विरूद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. अंगकृषने कॅच घेण्यासाठी झेप घेतली. अंगकृषला या दरम्यान बोटाला दुखापत झाली. त्यामुळे अंगकृषच्या जागी कनक्शन सब्स्टीट्यूट म्हणून तेजस्वी सिंह दहीया याला मैदानात यावं लागलं होतं. तेजस्वीने विकेटकीपिंगसह बॅटिंगची जबाबदारी सांभाळली.

शेन वॉटसनने काय सांगितलं?

केकेआर टीमचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनी सामन्यानंतर अंगकृषच्या दुखापतीबाबत सविस्तर माहिती दिली. अंगकृषला कॅच घेताना मानेलाही दुखापत झाली. त्यामुळे कनक्शन सब्स्टीट्यूटचा वापर केल्याचं वॉटसनने स्पष्ट केलं.

आयसीसीकडून जून 2025 पासून लागू करण्यात आलेल्या नियमानुसार, खेळाडूला कन्क्शन आणि डोक्यासंबंधित दुखापत झाली असेल तर 7 दिवस क्रिकेटपासून दूर रहावं लागत. हा नियम आयपीएलमध्येही लागू होतो. त्यामुळे अंगकृषला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 24 मे रोजी होणाऱ्या सामन्याला मुकावं लागू शकतं.

अंगकृषची आयपीएल 2026 मधील कामगिरी

दरम्यान अंगकृषने आयपीएल 2026 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगकृषने या हंगामातील 13 सामन्यांत 42.20 च्या सरासरीने 422 धावा केल्यात. अंगकृषने या दरम्यान 5 अर्धशतकं लगावली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...